करमाळासोलापूर जिल्हा

महालक्ष्मी व्रतामुळे फळांचा बाजार तेजीत; मागणी वाढली

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

महालक्ष्मी व्रतामुळे फळांचा बाजार तेजीत; मागणी वाढली

केतूर (अभय माने); मार्गशीष महिन्यातील गुरुवारी महालक्ष्मीची व्रत केली जातात त्यासाठी केत्तूर (ता.करमाळा ) बाजारपेठांमध्ये पूजासाहित्य दाखल झाले आहे अवकाळी पावसाचा परिणाम फळांच्या विक्रीवर झाला असून फळांचे दर मात्र वाढले आहेत.

घरात सुख शांती लाभावी, लक्ष्मी मिळावी, घरातील सर्वांना उत्तम आरोग्य लाभावे या उद्देशाने लक्ष्मीदेवीची मनोभावे पूजा केली जाते या पूजेसाठी पाच प्रकारची फळे ,फुले , हार, विड्याची पाने यांना महत्त्वाचे स्थान असते.

शेवटच्या गुरुवारी लक्ष्मी व्रताचे महात्म कथा याची वाचन केले जाते पूजा विधीचीपुस्तके विक्रीसाठी आली आहेत ही पुस्तके घरोघरी हळदीकुंकवाच्या निमित्ताने वाटली जातात.

मार्गशीष गुरुवारच्या व्रतामुळे फळांना मात्र मागणी वाढली आहे यामध्ये केळी मोसंबी चिकू पेरू डाळिंब सफरचंद या फळांना मागणी वाढली आहे याच्या भावामध्ये भरमसाठ वाढ झाली आहे कारण अवकाळी पावसामुळे फळबागांना मोठा फटका बसला होता.

litsbros

Comment here