करमाळा शहरातील ‘या’ भागात बेकायदेशीर सावकारकीचा अतिरेक; पोलीस प्रशासनाने आळा घालण्याची मागणी
करमाळा(प्रतिनिधी) ; करमाळा शहरातील येथील भिमनगर,सिद्धार्थ नगर तसेच अण्णा भाऊ साठे नगर येथे बेकायदेशीर सावकारीने उच्चांक गाठलेला असून गरिब व असहाय्य लोकांना 10 ते वीस टक्के दराच्या व्याजातून बाहेर पडणे मुश्किल झाले आहे, काहि महिला देखील पोलिस प्रशासनासोबत सलोख्याचे संबंध असल्याचे दाखवून मेहतर व मातंग समाजातील नगरपालिका कर्मचारी यांना लूबाडत असल्याचे दिसून येत आहे.
काही दिवसांपूर्वी एका महिलेने आत्महत्येचा प्रयत्न देखील केला होता तरी पोलीस प्रशासनाने स्वतः चौकशी करून गोरगरिबांना सावकारीच्या या पाशातून बाहेर काढावे अशी मागणी निवेदनाद्वारे रिपाई चे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष नागेशजी कांबळे यांनी केली आहे.
निवेदनात पूढं म्हटले आहे कि सावकारी करणारी एक महिला हि पोलीस कर्मचारी व तहसील कर्मचारी यांच्या सोबत चहापाणी करून प्रशासनाशी संबंध असल्याचे भासवून सावकारकी करत आहे. त्यामूळे लोक तक्रार करण्यास पूढे येत नाहीत.
तसेच मेहतर(भंगी) समाज व मातंग समाजाचे अनेक सफाई कर्मचारी नगरपालिका येथे कामाला असून त्यांना या दहा ते वीस टक्के दरमहा व्याजातून बाहेर पडणे मुश्किल होऊन बसले आहे विशेष म्हणजे यातील काही कर्मचा-यांची खातेबूक,ATM कार्ड हे संबंधित बेकायदेशीर सावकारांकडे असल्याचे समजते पगार आली कि हे सावकार व्याज परस्पर काढून घेतात.
तेव्हा तोंड दाबून बूक्क्यांचा मार सहन करणा-या कर्मचारी व गोरगरिबांना पोलीस प्रशासनाने गूप्त माहिती काढून या सावकारी पाशातून वाचवावे अशी मागणी देखील या निवेदनात केलेली आहे.
सदरिल निवेदनाच्या प्रती उपविभागीय पोलीस अधिकारी, मा तहसीलदार, व मा सहायक निबंधक यांना पाठवण्यात आले आहे.
Comment here