करमाळाशेती - व्यापारसोलापूर जिल्हा

करमाळा तालुक्यात रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांची गडबड

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा तालुक्यात रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांची गडबड

केत्तूर(अभय माने) चालू वर्षी ऑक्टोबर महिन्यापर्यंत झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगामाची पूरती वाट लावली. आता जमिनीत ओलावा कमी झाल्याने वापसा झाल्याने रब्बी हंगामातील पिके घेण्यासाठी शेतकऱ्यांची गडबड सुरू झाली आहे.

करमाळा तालुक्यात प्रामुख्याने रब्बी ज्वारीचे पीक घेतले जाते परंतु, त्याचा पेरणी कालावधी संपला. गेल्या तीन-चार दिवसापासून थंडीचा जोर वाढू लागल्याने गहूं, हरभरा, कडधान्य, कांदा या पिकाकडे शेतकऱ्यांचा कल असल्याचे सध्यातरी दिसून येत आहे .

गहू पेरणीच्या कालावधी नोव्हेंबर ते 15 डिसेंबर तर हरभरा पेरणीच्या कालावधी 1 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर असल्याने तसेच पावसामुळे मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असल्याने शेतकरी गहू, हरभरा पिकाला पसंती देत आहेत असे दिसते.

litsbros

Comment here