करमाळाशेती - व्यापारसोलापूर जिल्हा

शेतकऱ्यांना भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेत सहभागी होण्याचे आवाहन; सोलापूर जिल्ह्यासाठी 587 लाख रुपये अनुदानाचे लक्ष

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

शेतकऱ्यांना भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेत सहभागी होण्याचे आवाहन; सोलापूर जिल्ह्यासाठी 587 लाख रुपये अनुदानाचे लक्ष

केतूर (अभय माने) भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना 2022-23 करीता 30 नोव्हेंबर 22 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी संजय वाकडे यांनी केले आहे.

यावेळी वाकडे यांनी बोलताना सांगितले की या योजनेच्या माध्यमातून पीक व पशुधन याबरोबरच फळबागेच्या रूपाने शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्नाचा स्त्रोत उपलब्ध करून देणे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यास व उत्पन्न दुप्पट करण्यास मदत करणे.असे उदिष्ट आहे.

यामध्ये आंबा, डाळींब, काजू, पेरू, सीताफळ आवळा, चिंच, जांभूळ, कोकम, फणस, कागदी लिंबू, नारळ, चिकू, संत्रा, मोसंबी, अंजिर, ईत्यादी फळपिकांचा समावेश आहे.

यासाठी सोलापूर जिल्ह्यास सर्वसाधारण,अनु.जाती व अनु.जमाती या प्रवर्गासाठी रु587.72 लाख ईतके लक्ष्य प्राप्त झाले आहे. तरी इच्छुक शेतकर्यांनी महा-डीबीटी पोर्टल http://mahadbtmahait.gov.in/यासंकेतस्थळावर आँनलाईन अर्ज करावेत

litsbros

Comment here