करमाळाशेती - व्यापारसोलापूर जिल्हा

कृषि क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल वाशिंबे येथील अभिजीत पाटील ‘नॅशनल ग्रेट अँचिवर्स’ पुरस्काराने सन्मानित

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

कृषि क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल वाशिंबे येथील अभिजीत पाटील ‘नॅशनल ग्रेट अँचिवर्स’ पुरस्काराने सन्मानित

केत्तूर (अभय माने) वाशिंबे (ता.करमाळा) येथील प्रयोगशील युवा शेतकरी अभिजीत राजाभाऊ पाटील व कुटुंबियांना कृषि व कृषीसलग्न क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल शेतकरीपुत्र फाऊंडेशन अहमदनगर यांच्या वतीने नँशनल ग्रेट अँचिवर्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

हाँटेल रेडीयन्स अहमदनगर येथील संपन्न झालेल्या कार्यक्रमात आमदार संग्राम जगताप, पद्मश्री पोपटराव पवार,बिजमाता पद्मश्री राहीबाई पोपरे यांच्या उपस्थितीत पुरस्काराचे वितरण झाले.पुरस्काराचे स्वरुप , प्रमाणपत्र,स्मृतिचिन्ह असे होते अभिजीत पाटील यांनी शेतात ड्रॅगन फृट,सफरचंद,येलंकी केळी,लाल केळी,तैवान पिंक पेरु,सिताफळ,शेवगा असे नवनवीन प्रयोग करत भरघोस उत्पन्न घेतलेले आहे.

योग्य व्यवस्थापन व कमी कालावधीत भरघोस उत्पादन यामुळे पाटील यांची शेती परिसरातील शेतकर्याना मार्गदर्शनपर ठरत आहे.

आपल्या शेतात माहिती साठी आलेल्या शेतकर्याना आवर्जून पिकातील बारकावे सांगत असतात.या सन्मानाबद्दल पाटील यांचे सर्व स्तरातुन कौतुक होत आहे.

छायाचित्र : अभिजीत पाटील यांचा सन्मान करताना आमदार आ.संग्राम जगताप पद्मश्री पोपटराव पवार आदींसह मान्यवर.

litsbros

Comment here