प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मोहसीन शेख यांचे बी.ए. परीक्षेत घवघवीत यश

प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मोहसीन शेख यांचे बी.ए. परीक्षेत घवघवीत यश

करमाळा (प्रतिनिधी); करमाळा शहरातील कानाड गल्ली येथील मोहसीन अलीम शेख याने जून 2022 मध्ये झालेल्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या वतीने घेण्यात आलेल्या बी ए अंतिम परीक्षेत प्रथम वर्गातून विशेष प्राविण्यसह घवघवीत यश मिळवले आहे.

मोहसीन शेख हे सध्या पुणे येथे एसएम जोशी महाविद्यालयामध्ये एमसीए या कॉम्प्युटर इंजिनिअरिंग करिता दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत आहे शेख याने यापूर्वी दहावी परीक्षेमध्ये प्रथम वर्गातून विशेष यश मिळवले होते मोहसिन शेख करमाळा येथील पत्रकार आलिम शेख यांचे ज्येष्ठ चिरंजीव आहेत.

त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्व शहरातून अभिनंदन होत आहे आपण भविष्यात कॉम्प्युटर इंजिनिअरिंग क्षेत्रातील पीएचडी मिळवणार असल्याचे त्यांनी बोलताना सांगितले.

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
karmalamadhanews24:
whatsapp
line