भिमाई बहुउद्देशीय सामाजिक संस्था व प्रेरणा मानव विकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने मुलांना शालेय साहित्य वाटप

भिमाई बहुउद्देशीय सामाजिक संस्था व प्रेरणा मानव विकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने मुलांना शालेय साहित्य वाटप

करमाळा (प्रतिनिधी) – भिमाई बहुउद्देशीय सामाजिक संस्था व प्रेरणा मानव विकास प्रतिष्ठान यांच्यावतीने मौलालीचा माळ येथील प्राथमिक शाळेत वह्या पेन पेन्सिल यासह विविध शालेय साहित्याचे वाटप करण्यात आलेे. यावेळी करमाळा एसटी आगाराचे आगार व्यवस्थापक होनराव साहेब कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होतेे.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मुबारक मदारी यांनी भूषवले यावेळी होनराव साहेबांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी श्री होनराव बोलताना म्हणाले की भिमाई बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने जनतेचे नगरसेवक जयकुमार कांबळे वह्या पेन्सिल पेन वाटपाचा जो कार्यक्रम घेत आहेत तो स्तुत्य आहे.

यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना खूप अभ्यास करून आयुष्यात उंच भरारी घेण्याचा सल्ला दिला यावेळी जनतेचे नगरसेवक जयकुमार कांबळे बोलताना म्हणाले की मौलालीचा माळ प्राथमिक शाळा ही मी दहा वर्षापासून दत्तक घेतलेले आहे या शाळेमध्ये आम्ही विविध सामाजिक उपक्रम राबवत असतो.

या सामाजिक कार्यातून माझ्या मनाला एक वेगळे समाधान लागते व आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या हिशोबाने आपण हे माझे सामाजिक कार्य सतत अविरत चालू राहील भविष्यात करमाळा तालुक्यातील गोरगरीब अनाथ मुलांसाठी आश्रम शाळा काढण्याचा माझा मानस आहे असे ते बोलताना म्हणाले.

यावेळी करमाळा नगरपालिकेच्या मा. नगरसेविका व महिला व बालकल्याण समितीच्या मा. सभापती सौ. सविता जयकुमार कांबळे , प्रेरणा मानव विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामदास कांबळे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मुबारक मदारी

धायतोंडे सर विजय पवार राजू पवार स्वप्निल पवार व व शाळेतील विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार धायतोंडे सरांनी मानले.

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
karmalamadhanews24:
whatsapp
line