सकारात्मक बातमी; करमाळा तालुक्यातील ‘या’ गावात आजपर्यंत एकही कोरोना रुग्ण नाही; सर्वत्र होत आहे कौतुक
जेऊर( प्रतिनिधी) राज्यभर कोरोनाने थैमान घातलेलं आहे. कोरोनासारख्या महाभयंकर महामारीने अनेक कुटुंबच्या कुटुंब संपवली आहेत. कोरोनामुळे अनेक दिग्गजांनी आपला प्राण गमावला. कोरोना शहरातच नाही तर खेड्यापाड्यातही पोहोचला आहे.
मात्र महाराष्ट्रातील एक गाव याला अपवाद ठरलं आहे.ते म्हणजे अहमदनगर व सोलापुर च्या सरहाद्दीवर छोटसं गाव डुकरेवाडी तसं पाहीलं तर नेहमीच दुर्लक्षित आसतं पण खरोखरच गावाने आदर्श दाखवून दिला आहे. एवढ्या महामारीत एक सुद्धा रुग्ण आडळुन आला नाही. हे गाव करमाळ्या पासुन दहा ते बारा किलोमीटर च्या अंतरावरच आहे.
या गावात शासनाने दिलेल्या नियमांचं काटेकोरपणे पालन आणि गावकऱ्यांच्या दृढनिश्चयामुळे कोरोनाला रोखणं शक्य झालं आहे. गावातील जवळ जवळ 80% लोकांनी लसीकरण करून घेतले आहे.
गावात भाजीपाला आणि किराणा आणण्यासाठीही बाहेर पडत नाही.
सर्व गरजा गावातच भागवल्या जातात त्यामुळे नियम आणि स्वयंशिस्त पाळली कोरोनाला दूर ठेवता येऊ शकतं हे डूकरेवाडीच्या ग्रामस्थांनी दाखवून दिलं आहे.
डूकरेवाडीचा हा आदर्श जर सर्वांनी समोर ठेवला तर देशातूनच नाहीतर जगातूनही कोरोनाला हद्दपार करणे अवघड जाणार नाही.
Comment here