डिकसळ पुलावरून जायचयं? तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे; आता या निर्णयामुळे ऊस वाहतुकदारांचे हाल तर शेतकर्यांचे नुकसान!
केत्तूर (अभय माने) : नुकताच पुन्हा एकदा सोलापूर व पुणे जिल्ह्यात जोडणारा ब्रिटिशकालीन डिकसळ पुल जड वाहतुकीसाठी बॅरिकेट लावून बंद केला हि चांगलीच गोष्ट म्हणावी लागेल त्यामुळे पुलाचा धोका टळेल.परंतु करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागातील जवळपास 30 ते 40 गावातील शेतकर्यांचा ऊस पुणे जिल्ह्यातील कारखान्याला गाळपासाठी जात आहे.
डिकसळ पुल बंद केला परंतु पर्यायी मार्ग कुठे आहे. रामवाडी येथील रेल्वे भुयारी मार्गाचे काम अर्धवट असुन त्याखाली पुर्ण चिखल आहे.त्यामुळे तीन ट्र्क्टर लावुन सुधा ऊस काढता येत नाही. यामुळे शेतकर्यांच्या ऊसाची नासाडी होत आहे.
तर ऊस वाहतुकदारांची पुरती दमछाक होत आहे.प्रशासनाला ऊस वाहतुकीचा प्रश्न योग्यरितीने हाताळावा लागेल.नाहीतर ऊसतोडणी बंद झाली तर शेतकर्यांच्या ऊसालावाली कोण?
Comment here