करमाळाराजकारणसोलापूर जिल्हा

कारखाना बंद पाडण्यासाठी नाही, तर शेतकऱ्यांचे पैसे थकवणे व रणदिवे यांना केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ मोर्चा; बागलांवर आठ दिवसात कारवाईची तुपकरांची मागणी

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

कारखाना बंद पाडण्यासाठी नाही, तर शेतकऱ्यांचे पैसे थकवणे व रणदिवे यांना केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ मोर्चा; बागलांवर आठ दिवसात कारवाईची तुपकरांची मागणी

करमाळा(प्रतिनिधी); काही लोक ‘हे कारखाना बंद पाडत आहेत’ असा प्रचार करत आहेत. पण आज स्वाभिमानीचा आक्रोश हा मकाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दिग्विजय बागल यांनी सोलापूर जिल्हा स्वाभिमानी युवा आघाडीचे अध्यक्ष विजय रणदिवे यांना केलेली मारहाण व अजूनही शेतकऱ्यांच्या थकवलेल्या बिलाच्या निषेधार्ह आहे. त्याची त्वरित चौकशी होऊन त्यांच्यावर कडक कारवाई करावी व एफ आर पी ची गेल्यावर्षीची रक्कम 100 टक्के शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने माजी मंत्री रविकांत तुपकर व त्यांच्या कार्यकर्त्यांच्या वतीने महसूल निवासी नायब तहसीलदार सुभाष बदे यांच्याकडे आज देण्यात आले.

कायदा व सुव्यवस्था या दृष्टिकोनातून करमाळा शहरात शांतता नांदावी या महत्त्वाच्या दृष्टिकोनातून करमाळा पोलिस खात्याने आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मोर्चा ला परवानगी दिली नव्हती. त्यामुळे माजी मंत्री तुपकर सहीत असंख्य कार्यकर्त्यांनी सरळ तहसील कार्यालयात वर जाऊन मागणीचे निवेदन दिले.

यावेळी उपस्थित मोर्चेकर्यांना संबोधित करताना माजी मंत्री तुपकर म्हणाले की आम्ही शेतकरी वर्ग पिकवतो तेव्हाच कारखाने चालतात आज सोलापूर जिल्ह्यामध्ये अनेक कारखान्याची एफ आर पी थकली आहे याशिवाय मकाई कारखान्याने गेल्या वर्षी ची एफ आर पी ची रक्कम शंभर टक्के द्यावी तसेच मकाई कारखान्याला गाळप परवाना नसताना कारखाना कसा चालतो हा मोठा गंभीर प्रश्न असल्याचेही त्यांनी बोलताना सांगितले.

सोलापूर जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा अध्यक्ष रणदिवे यांच्यावर झालेल्या मारहाणीची चौकशी होऊन मकाई कारखान्याचे चेअरमन यांच्यावर कडक कारवाई करावी व एफ आर पी ची रक्कम त्वरित सादर करावी या प्रमुख मागणीसाठी आजचा मोर्चा निघाला होता मात्र मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारल्याने मोर्चेकरी तहसील कार्यालयाच्या आवारात मोठ्या संख्येने जमले होते.

येत्या आठ दिवसात मकाई चे चेअरमन यांच्यावर कडक कारवाई करावी व एफ आर पी ची रक्कम त्वरित द्यावी अन्यथा याचे तीव्र पडसाद महाराष्ट्र राज्यभर उमटून आगडोंब होईल असा इशारा त्यांनी भाषणाच्या शेवटी दिला. यावेळी करमाळा चे नगराध्यक्ष वैभव राजे जगताप यांचेही भाषण झाले नगराध्यक्ष जगताप बोलताना म्हणाले की सदरच्या मोर्चा हा सर्व शेतकऱ्यांचा मोर्चा आहे.

शेवटी मागण्याचे निवेदन माजी मंत्री रविकांत तुपकर व नगराध्यक्ष वैभवराजे जगताप यांच्या वतीने महसूल निवासी नायब तहसीलदार सुभाष बदे व जेलर समीर पटेल यांच्याकडे देण्यात आले.
यावेळी करमाळा शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस उपविभागीय अधिकारी डॉक्टर विशाल अहिरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी पोलिस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात ठेवला होता.

हेही वाचा- खासगी बस आणि ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचा भीषण अपघात; दोन ठार तर सहाजण जखमी

शेतकऱ्याच्या ऊसाचे पैसे मागणाऱ्या स्वाभिमानीच्या युवा जिल्हाध्यक्षाला दिग्विजय बागल यांनी लगावली कानाखाली; गुन्हा दाखल करण्यासाठी शेतकरी आक्रमक

कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आज काढण्यात आलेला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा भव्य मोर्चा अखेर रद्द करण्यात आला मोर्चाचे नेतृत्व माजी मंत्री रविकांत तुपकर यांच्याकडे होते मात्र त्यांच्या गाड्यांचा फौज फाटा करमाळा नगर सरहद्दीवर अडविण्यात आला त्यामुळे असंख्य कार्यकर्त्यांनी सरळ तहसील कार्यालयाच्या आवारात समोरच मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती यावेळी सोलापूर जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे असंख्य कार्यकर्ते सहित पदाधिकारी मोठ्या संख्येने मोर्चात सामील झाली होती.

litsbros

Comment here