करमाळा तालुक्यातील श्री देवीचामाळ येथे यात्रा कमिटीची बैठक संपन्न
करमाळा(प्रतिनिधी) श्री देवीचा माळ याठिकाणी श्री कमलादेवी यात्रा कमिटीची बैठक संपन्न झाली. ही बैठक करमाळा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली.
यावेळी पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी यात्रा कमिटी ला विशेष मार्गदर्शन केले.या बैठकीला श्री देवीची माळ ग्रामपंचायतीचे सरपंच महेश सोरटे, उपसरपंच दिपक थोरबोले ,यात्रा कमिटीचे अध्यक्ष खंडू जगताप, उपाध्यक्ष अजित शिंदे तसेच खजिनदार पै रत्नदीप पुजारी, सचिव इरशाद शेख तसेच कमलाभवानी ट्रस्टचे अध्यक्ष सोमनाथ चिवटे,
ग्रामपंचायत सदस्य सचिन शिंदे, संतोष पवार, देवस्थानचे पुजारी दादासाहेब पुजारी, नागनाथ सोरटे, तुकाराम सोरटे, योगेश सोरटे ,नारायण सुर्वे ,मानकरी राजेंद्र फलफले, बापूराव चांदगुडे, भाऊसाहेब फुलारी , श्याम पुराणिक व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.
यात्रा कमिटीच्या या कार्यक्रम प्रसंगी सोलापूर जिल्हा शांतता कमिटीचे सदस्य आयुब शेख, गवारे हवालदार व इतर पोलिस कर्मचारी हजर होते.
Comment here