आरोग्यकरमाळासोलापूर जिल्हा

करमाळाकरांनो सावधान! डेंग्यू चा प्रसार वाढत आहे, आरोग्य प्रशासनाचे होत आहे दुर्लक्ष.?

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळाकरांनो सावधान! डेंग्यू चा प्रसार वाढत आहे, आरोग्य प्रशासनाचे होत आहे दुर्लक्ष.?

करमाळा(प्रतिनिधी); करमाळा शहर व तालुक्यात दिवसेंदिवस डेंगू सदृश्य रुग्ण वाढत असून याकडे आरोग्य प्रशासन साफ दुर्लक्ष करीत असल्याचे पहावयास मिळत आहे.

करमाळा तालुक्यातील पोथरे येथील संदीप बाळकृष्ण झिंजाडे पाटील या युवकाचा गेली चार दिवसापूर्वी डेंग्यू आजाराने निधन झाले तरी देखील आरोग्य प्रशासन झोपेचे सोंग घेत आहे अद्यापही ज्या गावात डेंगूणे एका युवकाचा नाहक बळी गेला.

त्या पोथरे गावात अद्यापही आरोग्य प्रशासनाने कोणत्याही पद्धतीची डास विरोधी फवारणी केलेली दिसत नाही संबंधित तालुका आरोग्य अधिकारी मात्र दुर्लक्ष करीत आहे वास्तविक पाहता त्या गावातील संपूर्ण नागरिकांचे रक्त तपासणी मोहीम घेणे गरजेचे असताना तसे झालेली दिसत नाही.

वास्तविक पाहता तालुका आरोग्य अधिकारी यांनी याकडे गांभीर्याने बघणे गरजेचे असताना उलट पणे तालुका अधिकारी नेमून दिलेल्या ठिकाणी कधीही हजर राहत नाही.

करमाळा शहरांमध्ये देखील डेंगू चे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असून अनेक खाजगी दवाखान्यांमध्ये अनेक रुग्ण उपचार घेत आहे करमाळा शहरात अनेक वॉर्डात घाणीचे वाढते साम्राज्य वाढले असून यामुळे डेंगू पोषक वातावरण निर्माण झाल्याचे पहावयास मिळत आहे.

तेव्हा नगरपालिका प्रशासनाने त्वरित डास विरोधी प्रतिबंधक फवारणी करणे ही मोहीम त्वरित राबवावी जेणेकरून डेंगू या आजाराचा नायनाट होण्यासाठी मदत होईल.

litsbros

Comment here