करमाळाक्रीडासोलापूर जिल्हा

दिग्गज संघांना नमवत करमाळ्याच्या गजानन क्रिकेट संघाने मारली बाजी

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

दिग्गज संघांना नमवत करमाळ्याच्या गजानन क्रिकेट संघाने मारली बाजी

करमाळा(प्रतिनिधी) ; येथील जीन मैदान येथे झालेल्या टेनिस बाॅल च्या एकदिवसीय स्पर्धेत अंतिम सामन्यात दहिगाव संघाला नमवत गजानन क्रिकेट संघ विजयी ठरला आहे. या स्पर्धेत करमाळा तालुक्यातील आठ प्रमुख संघांनी सहभाग नोंदविला होता.

अंतिम सामन्यात रोहित परदेशी, अमित बुद्रुक,मिलिंद दामोदरे ,अविनाश सावंत यांच्या चमकदार कामगिरीने आणि गजानन संघातील सर्व खेळाडूंनी केलेल्या चांगल्या कामगिरीच्या जोरावर प्रथम पारितोषिक पटकावले.

कमलेश कदम ,समीर सय्यद ,बंटी भडंगे,बापू सावंत,शकुर भाई ,उमेश सुरवसे,सचिन गायकवाड, तर समालोचन शाहरुख मुलाणी, अक्षय कांबळे यांनी केले तर पंच म्हणून रितेश कांबळे आणि मयूर कांबळे यांनी पाहिले.

litsbros

Comment here