करमाळयात व्हॉट्सॲपवर समाजात तेढ निर्माण करणारी पोस्ट; ग्रुप ॲडमिन आणि पोस्टकर्त्यावर गुन्हा दाखल, एकाला अटक

करमाळयात व्हॉट्सॲपवर समाजात तेढ निर्माण करणारी पोस्ट; ग्रुप ॲडमिन आणि पोस्टकर्त्यावर गुन्हा दाखल, एकाला अटक

करमाळा(प्रतिनिधी); सध्या महाराष्ट्रातील एकूण वातावरण हे सामाजिक ताण-तणावाचे निर्माण झालेले आहे त्यातच सोशल मीडियाच्या माध्यमातून स्टेटस ठेवणे, पोस्ट करणे या गोष्टींमधून अनेक सामाजिक तेढ वाढत आहेत. अशाच प्रकारे करमाळा तालुक्यातील ही एक धक्कादायक घटना घडली आहे.

करमाळा तालुक्यातील एका व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामाजिक तेढ निर्माण करणारे पोस्ट टाकल्याच्या तक्रारीमुळे सदर व्हाट्सअप ग्रुपच्या ग्रुप ॲडमिन सह पोस्ट टाकणारा विरोधात पोलिसात तक्रार दाखल झाली आहे त्यानंतर पोस्ट टाकणारास अटक करण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की व्हाट्सअप वर “करमाळा समाजकारण” नावाचा ग्रुप नितीन आढाव यांनी सुरू केलेला आहे त्या ग्रुप वर श्याम सिंधी यांनी 12 जून रोजी दोन समाजात ते निर्माण करणारे पोस्ट टाकलेली होती. ती पोस्ट त्याने स्वतः अथवा ग्रुप ॲडमिननेही डिलीट केली नाही. त्यानंतर ही माहिती करमाळा पोलिसांना मिळाली व करमाळा पोलिसांनी भादवी 505 (2) अंतर्गत समाजात निर्माण करणे हा गुन्हा दाखल केला.

13 जून रोजी करमाळा पोलिसांनी आरोपी श्याम सिंधी(मेनरोड, करमाळा) याला करमाळा न्यायालय समोर हजर केले न्यायाधीश यांनी त्याला पंधरा जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावलेले आहे. सदर प्रकरणी ग्रुप ॲडमिनवरही गुन्हा दाखल झालेला आहे.
या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मिटू जगदाळे हे करत आहेत.

या प्रकरणानंतर करमाळा तालुक्यात सोशल मीडियामध्ये एक खळबळ उडाली आहे सर्व अनेक ग्रुप ॲडमिन आपल्या ग्रुपचे सेटिंग ऑनलाईन केलेले आहे प्रत्येक जण आता पोस्ट करताना विचार करून पोस्ट करत आहे असे दिसून येत आहे.

karmalamadhanews24: