करमाळाक्राइमसोलापूर जिल्हा

फरश्या उतरवल्या अन् जेवणाचा डबा आणायला निघाला.. पण काळाने घात केला! ट्रक मागे घेताना ट्रक अंगावरून गेल्याने रोशेवाडी येथील एकाचा जागीच मृत्यू 

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

फरश्या उतरवल्या अन् जेवणाचा डबा आणायला निघाला.. पण काळाने घात केला! ट्रक मागे घेताना ट्रक अंगावरून गेल्याने रोशेवाडी येथील एकाचा जागीच मृत्यू

करमाळा (प्रतिनिधी); फरशी खाली करून
रिकामा झालेला ट्रक मागे घेताना जेवणाचा डबा आणायला चाललेल्या एकाच्या अंगावरून ट्रक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.
मोहन महादेव दुर्गुळे (वय 52) रा.रोशेवाडी तालुका करमाळा असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे.

करमाळा पोलिसात याची प्रथम आकस्मात मूर्ती म्हणून नोंद झालेली आहे. याबाबतची हकीकत अशी की , दररोज नित्यनेमाने मोहन दुर्गुळे हे रोशेवाडी वरून करमाळा येथे जेवणाचा डबा आणण्यासाठी येत होते.

त्याप्रमाणे आज सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास ते करमाळा येथे येत असताना करमाळा पुणे रोडवरील दिवाणजी हॉटेलच्या जवळ आले असता तेथे माल ट्रक क्रमांक एमएच 13/9445) हे फरशी खाली करून मागे घेत होते.

यावेळी मोहन दुर्गुळे हे मागील चाकाखाली सापडून जागेवरच ठार झाले. याबाबत करमाळा पोलिसात साहेबराव महादेव दुर्गुळे (वय 57) रोशेवाडी यांनी करमाळा पोलिसात दिली आहे.

याबाबत ट्रकचालक यांच्या विरोधात हयगयीने वाहन चालून एकास मृत्यू होण्यास कारणीभूत झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा तपास हवालदार संतोष देवकरे करीत आहे.

litsbros

Comment here