करमाळाक्राइमसोलापूर जिल्हा

‘इथे म्हैस का चारतो.?’ म्हणून तिघांची एकास मारहाण; करमाळा पोलिसात गुन्हा दाखल

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

‘इथे म्हैस का चारतो.?’ म्हणून तिघांची एकास मारहाण; करमाळा पोलिसात गुन्हा दाखल

करमाळा(प्रतिनिधी) ; ‘इथे म्हैस का चारतो.?’ असे विचारात तिघांनी एकास बेदम मारहाण केल्याची घटना करमाळा तालुक्यातील चिखलठाण नंबर एक येथे घडली आहे. सदर प्रकरणी करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

हा प्रकार सोमवार 20 सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता चिखलठाण नंबर १ येथे घडला आहे. याबाबत भागवत आजिनाथ रोकडे (रा.चिखलठाण नं.१) यांनी फिर्याद दिली आहे.

हेही वाचा- एक मोठं स्वप्न पूर्ण होण्याआधीच संपलं; करमाळयाच्या बंडूचा हरियाणात मृत्यू; आज झाले अंत्यसंस्कार

जिल्हा बॅकेच्या ‘थेट अल्पमुदत कर्ज’ योजनेतुन शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा; वांगी येथील शेतकरी मेळाव्यात आवाहन बँक प्रशासक कोतमीरे यांचे आवाहन

त्या तक्रारीत भागवत रोकडे यांनी म्हटले आहे की, गावातील वॉटरसप्लाय पाण्याची विहीरी जवळील अनिल शंकर चव्हाण यांचे उजनीत संपादित शेतीमध्ये मी म्हशी चारत होतो. त्यावेळी तेथे अनिल शंकर चव्हाण, राजेंद्र काशिनाथ चव्हाण, आबा राजेंद्र चव्हाण (सर्व रा. चिखलठाण नं 1) आले.

‘तु येथे म्हैस का चारतो?’ असे म्हणत या तिघांनी मला बेदम मारहाण केले व जखमी केले. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

litsbros

Comment here