करमाळाक्राइमसोलापूर जिल्हा

करमाळा येथे झालेल्या अनैतिक संबंधातून खून प्रकरणी एकास जामीन

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा येथे झालेल्या अनैतिक संबंधातून खून प्रकरणी एकास जामीन

उमरड(प्रतिनिधी) दिनांक 12/08/20 सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास करमाळा जामखेड रोड वरील हॉटेल हिंदवी समोर असणारे डांबरी रोड च्या कडेला खड्ड्यामध्ये एक इसम अंदाजे 35 ते 40 वर्षे वयाचा मयत अवस्थेत आढळून आल्या बाबतची माहिती हॉटेल हिंदवी चे मालक गजानन यादव यांनी करमाळा पोलीस स्टेशन येथे दिलेली होती.

पोलिसांनी घटनास्थळावर जाऊन सदरील इसमाचे प्रेत ताब्यात घेऊन तसा पंचनामा करून ग्रामीण रुग्णालय करमाळा येथे दाखल केले होते. तशी नोंद अकस्मात मयत रजिस्टरला घेण्यात आली होती. तदनंतर तपासादरम्यान साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले.

घटनेचे प्रत्यक्ष साक्षीदार यांच्या जबाबावरून सदरील इसम हा अनिल मोरे राहणार जामगाव तालुका आष्टी जिल्हा बीड येथील रहिवासी असून त्याचा खून अभिजीत उर्फ अंकित जगन्नाथ बुचडे याने व मयत अनिल मोरे यांची पत्नी संगीता अनिल मोरे यांनी कट करून केलेला असल्याचे निष्पन्न झाले.

हेही वाचा- सकारात्मक बातमी; करमाळा तालुक्यातील ‘या’ गावात आजपर्यंत एकही कोरोना रुग्ण नाही; सर्वत्र होत आहे कौतुक

आता घरबसल्या मिळणार आपल्या परिसरातील कोरोना लसीची माहीती;केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केला व्हॉटसअप नंबर जारी

सदर घटनेबाबत पोलीस नाईक अनिल बाळू निंबाळकर यांनी दिनांक 16/ 8/ 2020 रोजी करमाळा पोलीस स्टेशन येथे रितसर फिर्याद दाखल केली. आरोपी नंबर एक अभिजीत बुचडे व आरोपी नंबर दोन संगीता मोरे यांना दिनांक 16/08/2020 रोजी अटक करण्यात आली होती.

यातील आरोपी नंबर एक अभिजीत उर्फ अंकित जगन्नाथ बुचडे याने ॲडव्होकेट निखिल पाटील यांचेमार्फत जिल्हा व सत्र न्यायालय बार्शी येथे जामीन मिळणे का मी अर्ज दाखल केला होता.

सदर अर्जाची सुनावणी सुनावणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री अग्रवाल साहेब यांच्यासमोर झाली सदर अर्जाच्या युक्तिवाद वेळी आरोपीचे वकील निखिल पाटील यांनी सदर घटनेमध्ये आरोपीचा काहीएक संबंध नसून त्याला केवळ संशयावरून अटक केलेली आहे आरोपी नंबर एक अभिजीत व संगीता यांनी कट केल्या बाबतचा कुठलाही पुरावा आरोपपत्र मध्ये दिसून येत नाही, तसेच सदर गुन्ह्याचा तपास पूर्ण झालेला असून अद्याप सीए रिपोर्ट येणे बाकी आहे.

तसेच खटला सुनावणीस बराच अवधी लागणार असून आरोपी मागील नऊ महिन्यापासून जेलमध्ये आहेत तसेच मयत अनिल मोरे यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला यावर सुद्धा शंका उपस्थित केली तसेच त्याचे शरीरावर मृत्यू येण्यासारखी कुठलीही जखम नसून सध्या परिस्थितीत त्याचा खून झाला असे म्हणता येणार नाही असा युक्तिवाद केला.

सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी अभिजीत उर्फ अंकित जगन्नाथ बुचडे याची तीस हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर व दोन जामीनदार देण्याच्या अटीवर जामिनावर मुक्तता करण्यात आली यात आरोपी अभिजीत यांच्यावतीने ॲडव्होकेट निखिल पाटील व ॲडव्होकेट सुहास मोरे करमाळा यांनी काम पाहिले.

litsbros

Comment here