करमाळाक्राइम

विविध गुन्ह्यात हवा असलेला व १७ वर्षांपासून फरार असलेल्या अट्टल गुन्हेगाराला सिनेकाठी सिनेस्टाईल अटक; करमाळा पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

विविध गुन्ह्यात हवा असलेला व १७ वर्षांपासून फरार असलेल्या अट्टल गुन्हेगाराला सिनेकाठी सिनेस्टाईल अटक; करमाळा पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी

करमाळा (प्रतिनिधी) ; विनयभंग, दरोडा, घरफोडी व जबरी चोरी असे वेगवेगळे गुन्हे दाखल असलेला व गेली 17 वर्षांपासून फरार असलेल्या संशयित आरोपी पकडण्यात करमाळा पोलिसांना यश आले आहे.बंडू ऊर्फ बंड्या होनाजी उर्फ होन्या पवार असे पकडलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. तो ४० वर्षाचा असून आवाटी तालुका करमाळा येथील राहणार आहे.

संशयित आरोपी बंडू ऊर्फ बंड्या होनाजी उर्फ होन्या पवार याच्यावर करमाळा, कुर्डुवाडी व दौड रेल्वे पोलिसात गुन्हे दाखल आहेत. संशयित आरोपी हा चोऱ्या करून फरार होताहोता. त्याच्यावर करमाळा पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत. ३९५, ३५४ व ३२४ या कलमांतर्गत हे गुन्हे दाखल झालेले आहेत.

कुर्डुवाडी पोलिसात एक गुन्हा दाखल असून ३९४ व ३९७ या कलमांतर्गत हा गुन्हा दाखल झालेले आहे. तर दौड रेल्वे पोलिसात ३७९ या कलमांतर्गत त्याच्याविरुद्ध तीन गुन्हे दाखल आहेत.

हेही वाचा- वाशिंबेतील पोस्टमन पवार यांचा स्तुत्य उपक्रम! शेताच्या बांधावर जाऊन ऊघडली सुकन्या समृद्धी योजने अंतर्गत खाती

पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 10 वा हप्ता ‘या’ दिवशी होणार जमा, एक मेसेज कोट्यावधी लाभार्थ्यांना

संशयित आरोपीवर २००४ पासून २०१९ दरम्यान सहा गुन्हे दाखल झालेले आहेत. तेव्हापासून तो फरार होता. पोलिस त्याच्या मागावर होते. मात्र तो सापडत नव्हता. अखेर पोलिसांना त्याला पकडण्यात यश आले आहे. करमाळ्याचे पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांना पवारबद्दल माहिती मिळाली.

अटक केलेला आरोपी बंडू ऊर्फ बंड्या होनाजी उर्फ होन्या पवार

त्यानंतर पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते व उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्याला अटक करण्यात आली आहे. यासाठी तौफिक काझी, महिला पोलिस शितल पवार, गणेश खोटे व संतोष देवकर या पोलिस कर्मचाऱ्यांनी विशेष कामगिरी केली.

litsbros

Comment here