घरात लावलेल्या ऍक्टिव्हा गाडीची चोरी; करमाळा पोलिसांत तक्रार दाखल
करमाळा(प्रतिनिधी) ; करमाळा तालुक्यातील कविटगाव येथे ऍक्टिवा गाडीची चोरी झाली आहे. पण अजवर दारात उभ्या असलेल्या गाड्या चोरी जायच्या पण या चोरट्यानी लॉक असलेल्या घराचे कुलूप तोडून गाडीची चोरी केल्याने हा सर्वत्र चर्चेचा विषय झाला आहे.
कविटगाव येथील भारत माने यांनी दिलेल्या तक्रारी नुसार , त्यांची मुलगी कौशल्या हि सध्या मुंबई ला असते पण तिची ऍक्टिव्हा गाडी कविटगाव येथेच असते.
भारत माने याना ही मुंबई ला जायचे असल्याने त्यांनी ती गाडी(MH 43, BH 8868) घरात लावून घराला बाहेरून कुलूप लावले व ते 2 नोव्हेंबर रोजी मुंबई ला गेले आणि 19 नोव्हेंबर 2021 रोजी मुंबई हुन परत आले.
पण मुंबई वरून माघारी आले तेव्हा त्यांना आपल्या घराचे कुलूप तोडलेले दिसले आणि घरात लावलेली ऍक्टिव्हा गाडी तेथे दिसली नाही. म्हणजेच आपल्या घरातील गाडीची चोरी झाल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी या चोरीचा पोलिसात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.
Comment here