करमाळाक्राइमसोलापूर जिल्हा

करमाळा शहरातील व्यावसायिकाचा गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह; आत्महत्या की खून.? शहरात खळबळ

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा शहरातील व्यावसायिकाचा गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह; आत्महत्या की खून.? शहरात खळबळ

करमाळा(प्रतिनिधी) ; आज मंगळवारी दुपारी करमाळा शहरातील मेनरोडवर कापड दुकान असणारे व्यावसायिक श्रीकांत गणपत रच्चा यांचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरी गळा कापलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. हा खून की आत्महत्या यावरून करमाळा शहरात एकच खळबळ उडाली आहे.

रच्चा यांचे वय 59 वर्षे होते. सुरवातीच्या काळात ते राजकारणात सक्रिय होते. त्यानंतर ते खरेदी विक्री क्षेत्रात ही काम करत होते. सध्या मेनरोडवर कापड दुकान ते चालवत होते. आज त्यांचा मुलगा माल खरेदीसाठी सोलापुरला गेला होता तर पत्नीला त्यांनी गावी सोडले आहे.

http://ट्रक व चारचाकी वाहन यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एकजण जागीच ठार;तर दोघे जखमी

दुपारी 12 च्या सुमारास त्यांनी त्यांच्या कामगाराला बागवाननगर मध्ये जायचे आहे, म्हणून फोनवरून घरी बोलावून घेतले. कामगार त्यांचे घराचे वरच्या मजल्यावर गेला असता, दारातच फर्शी कट करायच्या कटरने गळा कापल्याचे दिसले. बाबूशेठ रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसल्यावर त्यांनी इतरांना बोलावून घेतले. ते मरण पावल्याची खात्री पटल्यावर पोलीसात माहिती दिली.

या घटनेने करमाळा शहरातील व्यावसायिक क्षेत्रात व नागरिकांत खळबळ उडाली असून, पोलिसांत सध्या आकस्मित मृत्यूची नोंद झाली आहे. हा खून की आत्महत्या.? यामागील कारणे व पुढील तपास करमाळा पोलिस करत आहेत.

litsbros

Comment here