करमाळा तालुक्यात लसींचा तुटवडा; लस वितरणाबाबत ही योग्य नियोजन हवे
केतूर (अभय माने); वरचेवर तालुक्याच्या ग्रामीण भागातही कोरोना बाधितांचे संख्या वाढत आहे. रुग्णांना दवाखान्यात बेड,ऑक्सिजन व औषधांची उपलब्धता होत नाही तर दुसरीकडे लशींची गतीही मंदावली आहे, गरज असूनही लस उपलब्ध होत नसल्याने आरोग्य प्रशासनही हतबल झाले आहे. नागरिक लस घेण्यासाठी आरोग्य केंद्रात गर्दी करत आहेत मात्र आरोग्यकेंद्रांमध्ये लस उपलब्ध नसल्याने त्यांना लसीविनाच माघारी फिरण्याची वेळ येत आहे.
करमाळा तालुक्यात करमाळा शहरासह केम,जेऊर,कोर्टी, वरकुटे,साडे, या ठिकाणी लसीकरण सुरू आहे. सुरुवातीला लसीबाबत अफवा पसरल्याने व भीतीचे वातावरण तयार झाल्याने नागरिकांचा प्रतिसाद अल्प होता परंतु घेतल्यानंतर काही होत नाही असे समोर आल्याने लसीसाठी गर्दी होत आहे.
करमाळा तालुक्यातील ‘या’ तीन गावचा ग्रामदैवत यांचा यात्रा उत्सव रद्द
परंतु शासनाकडून आरोग्य केंद्रांना लसीचा पुरवठा अत्यल्प होत असल्याने 25 किलोमीटर अंतरावरून येणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे व लशीविनाच माघारी फिरावे लागत आहे.
पंचेचाळीस वर्षावरील नागरिकांना लस सध्या मिळत असली तरी त्यातही कमतरता आहे तर 18 वर्षावरील नागरिकांना न देण्याचे शासनाने एक मेपासून ठरविले आहे यांना लाज कशी मिळणार हा प्रश्नच आहे.
करमाळयात समता परिषदेतर्फे भाजपचे चंद्रकांत पाटील यांचा निषेध
सध्या कोटी आरोग्य केंद्राला शंभर ते दीडशे डोस मिळत आहे आणि मागणी भरपूर आहे शासनाने वाढवून द्यावी अशी मागणी आरोग्य केंद्राचे प्रमुख डॉ. सुजित सिंह मोहिते यांनी केली आहे.
करमाळा तालुक्यात कोरूना प्रतिबंधक लस घेणाऱ्यांची संख्या वरचेवर वाढत आहे त्यामुळे वाढवावी कारण ” लस नको पण गर्दी आवरा” असा प्रकार होत असल्याने लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून तालुक्यातील लसीकरण केंद्रांवर उपलब्ध करून द्यावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
18 ते 44 या वयोगटातील सर्वांना प्रतिबंधक लस मोफत देण्याची घोषणा नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे मात्र याबाबत आतापासूनच नियोजन करणे आवश्यक आहे अन्यथा यावेळी गर्दी निश्चितच वाढणार आहे.
Comment here