आरोग्यकरमाळाकरमाळा कोरोना अपडेटकुर्डुवाडीकेमकोर्टीजेऊरपांडेमाढावांगीवीट

फक्त कोरोनाने नाही तर ‘या’ कारणाने ही वाढत आहे करमाळा शहर व तालुक्यातील रुग्णांचे मृत्यूचे प्रमाण

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

फक्त कोरोनाने नाही तर त्यावरच्या उपचारासाठी विलंब होत असल्याने करमाळा शहर व तालुक्यातील रुग्णांचे मृत्यूचे प्रमाण वाढत आहे

करमाळा (प्रतिनिधी); कोरोनाचा हा विषाणू जास्त अग्रेसिव असून पहिल्या लाटेत ज्येष्ठा मध्ये संसर्गाचे प्रमाण सर्वाधिक होते आता सर्वांनाच त्याची बाधा होऊ लागली आहे लक्षणे असतानाही आजार अंगावर काढल्याने आणि उपचारासाठी विलंब होत असल्याने मृत्यूचे प्रमाण सध्या करमाळा शहर व तालुक्यात वाढू लागले आहे.

यामुळे मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याने तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक रुग्णांना वेळेवर ऑक्सिजन बेड तसेच व्हेंटिलेटर मिळत नसल्याने त्यांना आपला नाहक जीव गमवावा लागत आहे. नागरिकांनीदेखील कोरूना चा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी साखळी तोडण्याचा करिता व शासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी आरोग्य यंत्रणेस सहकार्य करणे गरजेचे आहे.

नागरिकांनीही त्रास होत असतानाही अंगावर आजार काढण्याचे प्रमाण वाढत आहे लक्षणे असतानाही टेस्टसाठी संशयिता कडून नकार दिला जात आहे पॉझिटिव्ह व्यक्तीकडून संपर्कातील व्यक्तीची माहिती लपविली जात आहे.

हेही वाचा- अदर पुनावालांना शिवसेनेच्या गुंडांनी लसीसाठी धमकी दिली

तिसऱ्यांदा सत्ता मिळवणाऱ्या ममता बॅनर्जी यांनी विजयानंतर केली ‘ही’ मोठी घोषणा

सोशल मास्क न वापरणे डिस्टिंक्शन न पाळणे या नियमाचे गांभीर्याने घेणे आवश्यक आहे मात्र तसे न होता आज करमाळा शहर व तालुक्यात बिनदिक्कतपणे अनेक संशयित रुग्ण बिनधास्तपणे फिरत असताना पहावयास मिळत आहे.

litsbros

Comment here