आरोग्यकरमाळासोलापूर जिल्हा

कोरोना काळात करमाळा तालुक्यात नागरिकांत मांसाहार व व्यसनांत वाढ :मांसाहारासाठी ठरलेले वार ही संपले : ‘माळ’कऱ्यांची ही निघाली माळ

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

कोरोना काळात करमाळा तालुक्यात नागरिकांत मांसाहार व व्यसनांत वाढ :मांसाहारासाठी ठरलेले वार ही संपले : ‘माळ’कऱ्यांची ही निघाली माळ

केतूर(अभय माने); गेल्या दोन वर्षापासून नागरिक कोरोना संसर्गाने पछाडलेला आहे मध्यंतरी आता तरी कुठे कोरोनापासून सुटका झाली असे वाटत असतानाच पुन्हा एकदा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर माजवला आहे.ग्रामीण भागातही कोरोना रुग्णांची संख्या वरचेवर वाढत आहे. त्यातच कोरोना बाधित रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी फळा ऐवजी डॉक्टरमंडळीकडून मांसाहारी आहार घेण्याचा सल्ला देत असून व कोरोनाग्रस्त रुग्णाचे नातेवाईक या सल्ल्याची तंतोतंत पालन करीत असून मांसाहाराला प्राधान्य देत असल्याने आत्तापर्यंत ज्यांनी कधीही मांसाहार केला नव्हता ते ही मांसाहार करू लागले आहेत.

वर्षानुवर्षे उपास-तापासकरणाऱ्यांनीही उपासतापास करणेही बंद केले असून ‘माळ’कऱ्यांनीही माळ काढून मांसाहाराला पसंती दिल्याचे चित्र समोर आले आहे. तर कधीही दारूला स्पर्शही न करणारे औषध म्हणून दारू घेऊ लागले आहेत. एकूणच कोरोनाने शाकाहारी लोकांना मांसाहारी व बिगर व्यसनी लोकांना व्यसनी बनवल्याचे काम मात्र केले आहे.

सध्या शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असून या लाटेत तरुणांचाही समावेश आहे. तर बाधितांचे मृत्युमुखी पडण्याचे प्रमाणही वाढले आहे. शासन-प्रशासन कोरोना आटोक्यात आणण्यासाठी मोठे काम करीत असूनही कोरोना बाधितांची संख्या व आकडा वरचेवर वाढतच आहे.बाधित रुग्णांना औषधोपचाराबरोबरच आहारात फळांना ऐवजी अंडी, मटण, मासे, चिकन खाण्याचा सल्ला डॉक्टरमंडळी कडून दिला जात आहे.

औषधोपचाराबरोबरच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अंडी, मटण, चिकन, मासे रुग्णांना दिले जात आहेत त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते असे डॉक्टरमंडळी सांगत आहे त्यामुळे घराघरात सध्या कुठला वार आहे हे न पाहता मांसाहाराचा बेत आखला जात आहे.

कोरोना आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाने सध्या लॉकडाउन सुरू केली आहे जिभेचे चोचले पुरवण्यासाठी मटण, मासे, अंडी, चिकन यावर ताव मारला जात आहे ठराविक वार पाहून त्या दिवशीच मांसाहार करणारे मात्र आता वारही न पाहता मांसाहार करू लागले आहेत.

हेही वाचा- लॉकडाऊन मध्ये पैसे घेऊन गाड्या सोडणारे 4 पोलिस तडकाफडकी निलंबित; अधीक्षक तेजस्विनी सातपुते यांची कारवाई

बेरोजगारीला त्रासून पत्नी आणि मुलाचा खून करून स्वतः केली आत्महत्या; सोलापूर जिल्ह्यातील परिवाराचा लोणी काळभोर येथे अंत

ऐन उन्हाळ्यात चिकन, अंड्यांना मागणी कमी असते परंतु, कोरोनामुळे या सर्वांना मागणी वाढली आहे त्यामुळे त्याची दरही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत 5 रुपयांना मिळणारे अंडे सध्या 7 रुपयांना मिळणेही अवघड झाले आहे तर चिकनचे दरही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत तरीही ग्राहक ते घेत आहेत त्यामुळे या मांसाहारी जिनसांची टंचाई निर्माण होत आहे.

त्यातच दारू पिल्याने कोरोना संसर्ग होत नाही अशी अफवा पसरल्याने दारुला हातही न लावणारी बहुतांश मंडळी सध्या औषध म्हणून गुपचूप केवळ कोरोनाच्या भीतीपोटी दारू पिऊ लागले आहेत तर काहीजण संध्याकाळी जेवणाअगोदर थोडी थोडी दारू पिऊ लागले आहेत.

अंडी, चिकन, मटन, यामध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन यासारखे शरीरास पोषक घटक आढळून येतात हे घटक शरीरातील प्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करत करतात त्यामुळे रोजच्या आहारात किंवा आठवड्यातील दोन तीन दिवस मांसाहार करने महत्वाचे व गरजेचे आहे.

– डॉ.दिलीप कुदळे,केतूर.

” कोरोना आणि दारू याचा अर्थाअर्थी काहीही संबंध नाही याला काही शास्त्रीय आधारही नाही परंतु केवळ अफवेमुळे असे प्रकार सर्रास घडत आहेत त्यामुळे निश्चितच व्यसनाधीनता मात्र वाढेल ‘करमाळा माढा न्यूज’ या अफवेच्या व अंधश्रद्धेच्या विरोधात आहे परंतु सद्यस्थिती काय आहे आहे हेच या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.”

– करमाळा माढा न्यूज

litsbros

Comment here