करमाळासोलापूर जिल्हा

ओला दुष्काळ जाहीर करा’, या मागणीसाठी काँग्रेसच्या वतीने करमाळा तहसीलदार यांना निवेदन 

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा, या मागणीसाठी काँग्रेसच्या वतीने करमाळा तहसीलदार यांना निवेदन

करमाळा(प्रतिनिधी); शेतकरी हा आपला अन्नदाता आहे.शेतकरी जगला तरच देश जगेल.परंतु परतीच्या पावसाने राज्यातील शेती व शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी प्रचंड हवालदिल झाला आहे. शेतकरी हा आपला अन्नदाता आहे.परंतु परतीच्या पावसाने संपुर्ण राज्यभरात मोठ्याप्रमाणात थैमान घातले आहे.

यामुळे राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत.असे असताना देखील राज्यातील सरकार साधे पंचनामेही करायला तयार नाही. खरे तर अश्या परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा मिळण्यासाठी तात्काळ मदतीची गरज आहे.मात्र राज्यसरकार केवळ टि.व्ही वर दिसत आहे.

या गंभीर बाबीकडे शासनाने लक्ष घालुन व राज्यात ओला दुष्काळ जाहीर करुन दिवाळीपुर्वी शेतकऱ्यांना भरीव मदत करावी असे लेखी निवेदन आज करमाळा तालुका काँग्रेस आयचे तालुकाध्यक्ष प्रतापराव जगताप यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार यांना देण्यात आले.

या निवेदनात शेतकरी हिताच्या दृष्टीने अनेक मागण्या करण्यात आल्या असुन यामध्ये प्रामुख्याने

१)संपुर्ण राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा.
२)हेक्टरी ७५०००/-रुपये मदत मिळावी.
३)मजुरांसाठी विशेष अनुदान जाहीर करावे.
४)मोदी सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांमुळे जागतिक भुक निर्देशांकात भारताची घसरण झाली असुन जगात १२१ देशापैकी १०४ व्या क्रमांकावर आपला देश आला आहे.हे अतिशय खेदजनक आहे.भारताची ही प्रतिमा सुधारण्यासाठी शेतकरी हिताचे व्यापक धोरण केंद्र सरकार कडुन आखण्यात यावे.

या प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.यावेळी ओ.बी.सी.विभागाचे तालुकाध्यक्ष गफुरभाई शेख,सचिव जैनुदीन शेख,अल्पसंख्याक विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष दस्तगीर पठाण,गोपिनाथ नाळे, दादा कुदळे,सुजय जगताप,योगेश राखुंडे,उत्तरेश्वर सावंत, गणेश फलफले, गितेश लोकरे,नितीन चोपडे,सुरज जाधव, आनंद झोळ, आदी उपस्थित होते.

यावेळी मा.तहशिलदार साहेबांनी हे निवेदन स्विकारुन आपण तुमच्या सर्वांच्या भावना शासनाकडे त्वरीत कळवु असे आश्वासीत केले.

litsbros

Comment here