करमाळा

करमाळा शहर व तालुक्यात पावसाचा हाहाकार; शहरात अनेक घरात पाणीच पाणी, नागरिक म्हणतात..

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा शहर व तालुक्यात पावसाचा हाहाकार; शहरात अनेक घरात पाणीच पाणी, नागरिक म्हणतात..

करमाळा(प्रतिनिधी) ; करमाळा शहर व तालुक्यात काल (बुधवारी) रात्री पावसाने हाहाकार माजविला. सदर पावसामुळे करमाळा शहरातील अनेक सर्वसामान्य गोरगरिबांच्या घरात अक्षरशा पाणी घुसते होते सुमारे दोन तास मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे शहरातील रस्ते जलमय झाले होते.

फंड गल्लीत काही घरांमध्ये पावसाचे पाणी घुसले होते. त्यामुळे नागरिकांना रात्र जागून काढावी लागली आहे. यामध्ये करमाळा शहरातील फंड गल्ली येथे राहणारा व मोलमजुरी करून आपले प्रपंच चालविणारा संतोष जाधव यांच्या घरामध्ये अक्षरशा डबक्याचे स्वरूप आले होते जाधव यांच्या या मुसळधार पावसामुळे चाळीस हजार रुपयाचे नुकसान झाले असल्याचे त्यांनी पत्रकाराशी बोलताना आपले मत व्यक्त केले.

करमाळा नगरपालिकेने आमच्या घराशेजारील गटारी वेळीच स्वच्छ व साफ केल्या असत्या तर आम्हाला ही वेळ आली नसती सदर घराच्या नुकसानीला नगरपालिका प्रशासन जबाबदार असल्याचे त्यांनी बोलताना आपले मत व्यक्त केले.

नगरपालिका प्रशासनाने मला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी श्री जाधव यांनी बोलताना व्यक्त केली यातून नगरपालिके च्या ढिसाळ कारभारावर नाराजी व्यक्त केली जात आहे.

litsbros

Comment here