आरोग्यकरमाळा

करमाळ्यात भव्य नेत्र चिकीत्सा व सर्व रोग निदान महा आरोग्य शिबीर संपन्न

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळ्यात भव्य नेत्र चिकीत्सा व सर्व रोग निदान महा आरोग्य शिबीर संपन्न

करमाळा (प्रतिनिधी); करमाळा तालुक्याचे मा .आ . जयवंतराव जगताप यांच्या १२ डिसेंबर रोजी असलेल्या व युवा नेते शंभूराजे जगताप यांच्या २ डिसेंबर रोजी झालेल्या वाढदिवसा निमीत्त विवीध सामाजिक , शैक्षणिक , क्रिडा व सांस्कृतीक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आले आहे .

त्यापैकी आज ९ डिसेंबर रोजी सकाळी १० .३० ते दुपारी ३ . पर्यंत करमाळा शहर व तालुक्यातील नागरिकांसाठी नेत्र चिकित्सा व सर्व रोग निदान महा आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते . यामध्ये शेकडो रुग्णांची तपासणी व उपचार करण्यात आले .यावेळी मान्यवरांच्या स्वागता नंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला .

यावेळी युवा नेते शंभूराजे जगताप व जेष्ठ नेते, आदिनाथ सह. साखर कारखान्याचे माजी संचालक दशरथ आण्णा कांबळे यांनी मनोगतातून मार्गदर्शन केले. त्यानंतर फीत कापून महा आरोग्य शिबीराचे उद्घाटन करण्यात आले.

या महा आरोग्य शिबीरात अहमदनगर येथिल साईदीप हॉस्पिटल चे तज्ञ डॉक्टर डॉ . श्रीधर बदे ( हृदयरोग तज्ञ) , डॉ भुषण खर्चे ( मेंदूरोग व मणका तज्ञ) , डॉ अभिजीत सिंगल( अस्थिरोग तज्ञ ) , डॉ . मेहवाश शेख ( बालरोग तज्ञ ) , डॉ . प्रणाली राठोड ( त्वचारोग तज्ञ ) , डॉ . ऋषिकेश मावळे ( मधुमेह व हृदयरोग तज्ञ ) , डॉ . श्रिमंत भालेराव ( मेडिकल कोऑर्डिनेटर ) ,करमाळा येथिल डॉ . मनोज कुंभार ( कन्सल्टिंग फिजीशियन) , डॉ . रोहन कुंभार ( स्त्री रोग तज्ञ ) , डॉ आशुतोष कापले , एच . व्ही . हॉस्पिटल पुणे येथिल नेत्र चिकीत्सक उदय झुरळे ,दिपक सादिगले आदी तज्ञ डॉक्टरानी रुग्णांची तपासणी करून उपचार केले.

यावेळी जेष्ठ नेते दशरथ आण्णा कांबळे , तालुका आरोग्य अधिकारी बोंडवे मॅडम ,गणेशभाऊ करे, जेष्ठ पत्रकार डॉ . बाबुराव हिरडे , मुख्याधिकारी बालाजी लोंढे, सुधाकर काका लावंड, झनकशेठ परदेशी , पत्रकार जयंत दळवी, बालरोग तज्ञ डॉ . प्रशांत करंजकर, डॉ . श्रीराम परदेशी , डॉ रोहन कुंभार , कृ उत्पन्न बाजार समिती चे संचालक सदाशिव पाटील , डॉ . आशुतोष कापले , डॉ मनोज कुंभार , विशाल घोलप , सनिल भोसले , गट सचिव नेते बबन मेहेर ,अमेय परदेशी , गणेश झोळ , एम एस ई बी चे श्री शिंदे साहेब ,भैरवनाथ विद्यालयाचे मुख्याध्यापक माने सर

अल्पसंख्यांक आघाडीचे युसुफ शेख सर , अॅड नवनाथ राखुंडे , सचिन क्षिरसागर पिंपळवाडी चे सरपंच बबन काळे पाटील, देविचामाळ चे सरपंच सोरटे , उपसरपंच दिपक थोरबोले , प्राचार्य कापले पी ए . , उपप्राचार्य बागवान सर , दत्तात्रय शिर्के भाऊसाहेब , पायघन भाउसाहेब, थोरात भाऊसाहेब , जाधव भाऊसाहेब , दळवे भाऊसाहेब , माने भाऊसाहेब , शुभम कात्रेला , संदिप पवार आदी उपस्थित होते .

litsbros

Comment here