आरोग्यकरमाळासोलापूर जिल्हा

करमाळा शहरात बुधवारी ‘यांना’ दिल्या जाणार स्लिप;  कोरोना लसीकरणाबाबत प्रशासना कडून ‘या’ सूचना; वाचा सविस्तर

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा शहरात बुधवारी ‘यांना’ दिली जाणार लस;  कोरोना लसीकरणाबाबत प्रशासना कडून ‘या’ सूचना; वाचा सविस्तर

करमाळा(प्रतिनिधी) ; करमाळा शहरातील नागरिकांना कोरोना लसीकरण करण्याबाबत प्रशासनाने जे नियोजन केले आहे त्यानुसार सध्या नागरिकांना स्लिप वाटप केल्या जात आहेत व लस उपलब्ध होताच लसीकरण होईल, त्याच्या सूचना योग्य वेळी देण्यात येतील असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या 9/5/2021 रोजीच्या आदेशांन्वये
करमाळा शहरातील नागरिकांच्या लसिकरणासाठी नोंदणी करून स्लिप वाटप करणेकामी करमाळा नगरपरिषदेला निर्देशित केले आहे.

मा.तहसिलदार करमाळा ,वैद्यकीय अधिकारी करमाळा,मुख्याधिकारी करमाळा यांनी मा.जिल्हाधिकारी साहेब सोलापूर वा मा.मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब सोलापूर यांनी दिलेल्या सूचने नूसार करमाळा शहरातील 60 वर्षावरील नागरिकांना प्राधान्यानै लसिकरण देणे विषयी सूचना केल्या आहेत. व त्त्यानंतर 45 व 45 वर्याषावरील नागरिकांनाकरीता लसीकरणाकरिता स्लिप वाटप केली जाणार आहेत.या स्लिप करमाळा नगरपरिषदेने केल्यावर ज्यांच्याकडे स्लिप आहे त्यांनाच काँटेज हॉस्पीटल येथे लस उपलब्ध होईल त्या दिवशी स्लीप नंबर नुसारच लस दिली जाणार आहे.

उदा.60 वर्षा वरील 1ते 300 अशा व 45 वर्षावरील 301-1000 नोंदणि झालेल्यांना नंबर टाकून स्लिप देण्यात आल्यावर
काँटेज येथे ज्या दिवशी लस उपवब्ध होईल त्या संख्ये ऐवढी यादी व क्रमांक घोषीत करण्यात येतील.

उदा.200 लसीचे डोस उपलब्ध झाल्यास 1-200 अशा प्रथम नोंदणी झालेल्या वयस्कर व्यक्ती ची यादी काँटेज बाहेर बोर्डवर लावण्यात येईल
व ज्यांच्याकडे 1-200 नंबरचे टोकण आहे अशा व्यक्तीना काँटेजला लस टोकण दाखवून मिळणार आहे.

45 व 45 वर्षे वरील नागरिकांना लसिकरणासाठी स्लिप देण्यासाठी सूचना-

1.ठिकाण-महादेव मंदीर खौलेश्वरमंदीरासमोर
मा.जयवंतराव जगताप बहुउद्देशिय सभागृह किल्ला विभाग मारूती मंदीरा जवळ

2.दिनांक-26/5/2021 वार बुधवार

3.वेळ-सकाळी 7 वाजता

4….प्रथम डोस करीता 45 वर्षे व त्यापेक्षा 45 पेक्षा जास्त वय (1961 च्या आधीची जन्म तारीख असलेले म्हणजे 1976,1975,1974,1973,1972…….. 1961,1960,1959…….1922,1921) असलेल्या करमाळा शहरातील नागरिकांस स्लीप दिली जाणार आहे.

5… क्रुपया 45 वर्षापेक्षा कमी वयाच्या नागरिकांना स्लीपचे वाटप होणार नाही.

6.सदर स्लिप आसलेल्यांना कॉटेज हॉस्पीटल येथे लस उपलब्ध होईल त्याप्रमाणे स्लीप नंबर (टोकन नंबर)नुसार लसीकरण केले जाईल.

7.आवश्यक कागदपञे-आधार कार्ड/निवडणूक ओळख पञ ज्यावार जन्मतारीख असेल व करमाळा शहरात राहत असल्याबाबत पत्ता असेल

8.स्लिप करीता येणारे यांनी डबल मास्क वापरणे वा सुरक्षित अंतर पाळणे आवश्यक आहे.

9.करमाळा शहराव्यतिरिक्त नागरीकांना स्लिप वाटप होणार नाही.

10.सदर स्लीप नंबर नुसार कॉटेज येथे लस उपलब्ध झाल्यानंतर नागरीकांनी लसीकरणासाठी उपस्थित रहावे.

11.ग्रामिण भागातील नागरीक वा ग्रामीण भागातील शिक्षक यांना संबधीत गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात लसिकरण केले जाईल त्यांनी करमाळा शहरातील नोंदणी कैंद्रात येवू नये .ही विशेष व नम्र सूचना.करमाळा शहराव्यतिरिक्त कोणत्याही नागरीकास सदर स्लिप देण्यात येणार नाही.

वरील सुचना मा.तहसिलदार साहेब ,मा.वैद्यकिय अधिक्षक,मा.मुख्यधिकारी यांच्या कडून देण्यात येत आहेत.
टिप उद्या बुधवार दि.26/5/2021 रोजी 45 व 45 वर्षांवरील सर्व नागरीकांना पहील्या डोस साठी नोंदणिकरण करून स्लिप वाटप होईल.
याची दखल घ्यावी
लस उपलब्ध झाल्यावर क्रमवार लसिकृरण केले जाईल

litsbros

Comment here