करमाळाराजकारणसोलापूर जिल्हा

करमाळा शहर भाजपच्या वतीने आ.गोपीचंद पडळकर यांना देण्यात आले ‘या’ मागण्यांचे निवेदन

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा शहर भाजपच्या वतीने आ.गोपीचंद पडळकर यांना देण्यात आले ‘या’ मागण्यांचे निवेदन

करमाळा(प्रतिनिधी) ; छोटे व्यावसायिक व फिरस्ते विक्रेते यांना शासनाने प्रोत्साहन निधी म्हणून विशेष पॅकेज द्यावे या संदर्भात येणाऱ्या अधिवेशनामध्ये आवाज उठविण्यासाठी करमाळा शहर भारतीय जनता पार्टी च्या वतीने विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांना निवेदन देण्यात आले.

गेल्या दीड वर्षापासून कोरोना महामारीमुळे छोटे व्यावसायिक आणि फिरस्ते विक्री वाल्यांचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे.छोट्या मोठ्या बँक आणि फायनान्स कडून पैसे गोळा करून आपला व्यवसाय मागील लॉक डाऊन मधून कसातरी बाहेर काढत असताना पुन्हा एकदा लॉक डाऊन मुळे या व्यावसायिकांचे खूप मोठे नुकसान झाले आहे.

 

अगोदरच अंगावर असणारे कर्ज,सक्तीने होणारी बँकेची वसुली व वीज बिल वसुली या सर्व गोष्टीमुळे व्यायसायिक हतबल झाला आहे.या व्यावसायिकांना पुन्हा एकदा आत्मनिर्भर करण्यासाठी व्यवसायामध्ये पुन्हा एकदा भरारी घेण्यासाठी प्रोत्साहन देणे आवश्यक आहे.

हेही वाचा- कोरोनामुळे अनाथ झालेल्या करमाळा तालुक्यातील मुलांचे शैक्षणिक पालकत्व घेणार व्याख्याते जगदिश ओहोळ; गरजूंनी संपर्क साधण्याचे आवाहन

करमाळा उपजिल्हा रुग्णालयात ‘या’ तारखेपासून सिझेरियन पुन्हा सुरू होणार, ‘या’ क्रमांकावर करा संपर्क

त्यासाठी राज्य शासनाने छोटे व्यावसायिक व फिरस्ते विक्री वाले यांना प्रोत्साहन निधी साठी विशेष पॅकेज जाहीर करावे या मागणीसाठी हे निवेदन देण्यात आले.

यावेळी तालुका सरचिटणीस अमरजीत साळुंखे, मा तालुकाध्यक्ष शशिकांत पवार,शहराध्यक्ष जगदीश आगरवाल,रेल्वे सल्लगार सदस्य दिपक चव्हाण,व्यापार आघाडी अध्यक्ष जितेश कटारिया,संजय गांधी निराधार चे नरेंद्र ठाकूर,सहकार आघाडी चे सचिन चव्हाण,युवा मोर्चाचे मयूर देवी,संजय जमदाडे,गणेश वाशिंबेकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

litsbros

Comment here