जागतिक योग दिनानिमित्त करमाळा शहर भाजपच्यावतीने उद्या ‘या’ ठिकाणी योगा आणि प्राणायम शिबिर चे आयोजन
केतूर ( अभय माने)–करमाळा शहर भारतीय जनता पार्टी आणि पतंजली योग पीठ यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक योग दिवस निमित्त योगा आणि प्राणायाम चे आयोजन 21 जून 2021 रोजी सकाळी 6 वाजता दत्त मंदिर विकास नगर येथे केले आहे.
योगाभ्यास हे शरीर आणि मन तंदुरुस्त ठेवण्याचे प्रभावी साधन म्हणून सिद्ध झाले आहे. भारतीय संस्कृतीची ही महान परंपरा आता जगभरातील जवळपास 200 देशांनीही स्वीकारली आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे व मनाचे सामर्थ्य वाढविणे यांसाठी योगसाधना उपयुक्त मानली जाते.
योग विद्येचा प्रसार व्हावा आणि योगाचे महत्व सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहचावे यासाठी योगा आणि प्राणायाम चे आयोजन केले आहे.
जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन भाजपा शहराध्यक्ष जगदीश आगरवाल यांनी केले आहे.
Comment here