करमाळाशैक्षणिकसोलापूर जिल्हा

कौतुकास्पद; करमाळा तालुक्यातील चिखलठाणचा आफताब आयटीएसई परिक्षेत राज्यात प्रथम ; वाचा सविस्तर

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

कौतुकास्पद; करमाळा तालुक्यातील चिखलठाणचा आफताब आयटीएसई परिक्षेत राज्यात प्रथम ; वाचा सविस्तर

करमाळा(प्रतिनिधी) ; इंटरनॅशनल टॅलेंट सर्च एक्झामिनेशन 2021 तर्फे आयोजित करण्यात आलेल्या इयत्ता आठवी वर्गातील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय परीक्षेत आफताब दादा सय्यद याने महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे.

त्याने २५० पैकी २३४ गुण मिळवुन राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्याला दादा गुलाम सय्यद, लक्ष्मण गोडगे ,मुख्याध्यापक गुरूराज माने आदि शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले.

आफताब सय्यद हा चिखलठाण नंबर एक येथील रमाबाई बाबूलाल सुराणा विद्यालयात सध्या इयत्ता नववीत शिक्षण घेत आहे. आफताब सय्यद याने मिळवलेल्या या यशाबद्दल कुगाव ग्रामपंचायतीच्या वतीने त्याचा सन्मान करण्यात आला.

यावेळी आदिनाथ कारखान्याचे माजी संचालक धुळाभाऊ कोकरे, कुगाव चे सरपंच महादेव कामटे, उपसरपंच मन्सूर सय्यद,माजी सरपंच महादेव पोरे, माजी उपसरपंच इन्नुसभाई सय्यद, आदिनाथ साखर कारखान्याचे चेअरमन धनंजय डोंगरे शाबुद्दीन सय्यद, वजीर सय्यद, आदि पदाधिकारी व ग्रामपंचायत सदस्य मान्यवर उपस्थित होते.

litsbros

Comment here