करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । युट्युब । व्हाट्सएप
एसटी महामंडळातील माजी इन्स्पेक्टर, कै.शालिवाहन गायकवाड यांचे निधन; गुरुवारी चिखलठाण येथे दशक्रियाविधी
(प्रतिनिधी); सर्वांशी प्रेमाने वागनारे, सर्वांना कायम मदत करणारे व मनमिळावू व्यक्तिमत्त्व असणारे कै.शालिवाहन (भाऊ) दत्तात्रय गायकवाड (वय ७२) यांचे मंगळवार दी २० सप्टेंबर २०२२ रोजी अल्पशा आजराने दुःखद निधन झाले.
त्यांचा दशक्रिया विधी २९ सप्टेंबर २०२२ रोजी श्री. कोटलींग मंदिर घाट मू.पो. चिखलठाण ता.करमाळा जि.सोलापूर येथे होईल. असे त्यांच्या परिवाराकडून सांगण्यात आले.
कै.शालिवाहन गायकवाड यांनी एस टी महामंडळ मध्ये असिस्टंट ट्रॅफिक इन्स्पेक्टर या पदावर उत्कृष्ट कामगिरी केली.
तसेच आदिवासी ठाकर समाज कृती समितीचे ते ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते होते. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी,दोन मुले,एक मुलगी,सूना,नातवंडे असा परिवार आहे.
Comment here