करमाळाक्रीडासोलापूर जिल्हा

‘करमाळा चषक’ क्रिकेट स्पर्धेत दहिगाव संघाने मारली बाजी; सिद्धार्थ स्पोर्टसचा मिलिंद दामोदरे मालिकावीर

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

‘करमाळा चषक’ क्रिकेट स्पर्धेत दहिगाव संघाने मारली बाजी; सिद्धार्थ स्पोर्टसचा मिलिंद दामोदरे मालिकावीर

करमाळा(प्रतिनिधी) ; करमाळा येथील मूकद्दर क्लब आयोजित भव्य करमाळा चषक टेनिस क्रिकेट स्पर्धेत अटीतटीच्या सामन्यात मूकद्दर संघाविरुध्द भैरवनाथ क्रिकेट क्लब दहिगाव ने बाजी मारून चषकावर आपले नाव कोरले.

येथील जिन मैदान येथे झालेल्या या स्पर्धेचे बक्षीस वितरण मा नगराध्यक्ष वैभवराजे जगताप यांचे हस्ते झाले.

यावेळी उपनगराध्यक्ष अहमद चाचा कूरेशी, अॅड संकेत खाटेर, अमोलशेठ परदेशी ,नानासाहेब मोरे, प्रविण ओहोळ, बाळासाहेब कांबळे इ च्या प्रमूख उपस्थितीत, बक्षीस वितरण करण्यात आले.

आपल्या तडाखेबंद फलंदाजीने सिद्धार्थ स्पोर्टस क्लब च्या मिलिंद दामोदरे याने उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकत मॅन ऑफ द सिरिज चा किताब पटकावला.

सिद्धार्थ स्पोर्टस क्लब ने तिसरे तर मूकद्दर संघाने दूसरे बक्षीस पटकावले.


तब्बल सोळा पेक्षा अधिक संघांनी सहभाग नोंदवत या स्पर्धेत रंगत आणली.

स्पर्धेच्या आयोजनासाठी मूकद्दर क्रिकेट क्लब, रियाज कूरेशी, घस्सू चाचा कूरेशी,लालू कूरेशी, अब्दूल कूरेशी, मूज्जू कूरेशी, प्रतीक ननवरे,रितेश कांबळे, अक्षय कांबळे, अमित ,शाहिद
बेग,शाहरूख मूलाणी इ नी परिश्रम घेतले.

litsbros

Comment here