कोरोना लसीच्या दुसऱ्या डोस साठी योग्य नियोजन करावे – जितेश कटारिया
करमाळा(प्रतिनिधी) ; आपल्या देशामध्ये आज घडीला मोठ्या प्रमाणात कोरोना संसर्गवर लसीकरण सुरू आहे.यामध्ये प्रत्येक व्यक्तीला निश्चित कालावधी नंतर कोरोना लसी चा दुसरा डोस घेणे अनिवार्य आहे. कोरोना लसीचा दुसरा डोस वेळेवर नाही दिला तर त्या डोस चा प्रभाव व कार्यक्षमता कमी होत जाते. त्यामुळे कोरोना लसीचा पहिल्या डोस चा काहीही उपयोग होणार नाही,म्हणून दुसरा डोस देण्यासाठी प्रशासनाने योग्य नियोजन करावे अशी मागणी भाजपा व्यापार आघाडी चे शहराध्यक्ष जितेश कटारिया यांनी केले आहे.
सध्या करमाळा शहरात व तालुक्यात कोरोना लसीची खूप कमतरता आहे.लसीकरण केंद्रावर दोन दोन दिवस सोडून लसीकरण होत आहे.अशा स्थितीत कोरोना लसीकरणाचा दुसरा डोस घेणाऱ्या नागरिकांना खूप अडचणी येत आहेत.नागरिक रोज लसीकरण केंद्रावर जाऊन तासन तास ताटकळत उभे राहून लस न घेताच परत यावे लागत आहेत.
त्यामुळे त्यांचे दुसरे लसीकरण डोस वेळेत न झाल्यास पहिल्या लसीकरणाच्या डोसचा काहीच अर्थ राहणार नाही.त्यामुळे भाजपा व्यापार आघाडी च्या वतीने सर्व बाबींचा विचार करून प्रशासनाकडे काही मागण्या केल्या आहेत.
करमाळा तालुक्यातील ‘या’ तीन गावचा ग्रामदैवत यांचा यात्रा उत्सव रद्द
1) प्रत्येक लसीकरण केंद्रावर दुसऱ्या डोस च्या लसीकरण साठी लस रिझर्व्ह केली जावी.
2) लसीकरण केंद्रावर दुसऱ्या लसीकरणाचा डोस घेणाऱ्यांसाठी वेगळी लाईन ठेवण्यात यावी.
अथवा
दुसरा डोस घेणाऱ्यांसाठी एखाद नवीन लसीकरण केंद्र सुरू करावे जेणेकरून एकाच ठिकाणी जास्त गर्दी होणार नाही. या मागण्या त्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केल्या आहेत.
Comment here