करमाळाक्राइमसोलापूर जिल्हा

मायलेकींचा खून, चौदा वर्षाची लेक आणि आई रक्ताच्या थारोळ्यात; करमाळा तालुक्यातील भिलारवाडी हादरले

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

मायलेकींचा खून, चौदा वर्षाची लेक आणि आई रक्ताच्या थारोळ्यात; करमाळा तालुक्यातील भिलारवाडी हादरले

करमाळा(प्रतिनिधी) ; ऐन दिवाळी पाडव्याच्या दिवाशी सर्व लोक उत्सव साजरा करण्यात दंग असताना करमाळा तालुक्यातील भिलारवाडीत मात्र सर्वांना हादरवून टाकणारा मायलेकींच्या खुनाचा थरार घडला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, करमाळा तालुक्यातील भिलारवाडी गावात अण्णासाहेब माने यांच्या घरात त्यांची पत्नी लक्ष्मीबाई अण्णासाहेब माने व १४ वर्षांची मुलगी यांचा मृतदेह घरात रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असल्याची माहिती पोलिसांना एका व्यक्तीने फोनद्वारे दिली व करमाळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

या मायलेकींचा मृतदेह पाहून यांचा खून रात्रीच झाल्याची शक्यता आहे. तर घरातील लक्ष्मीबाई यांचा पती अण्णासाहेब माने गायब असल्याने त्याने खून केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा- करमाळा MIDC तील ‘त्या’ तरुणाचा मृत्यू ; करमाळा पोलिसांसमोर नातेवाईक शोधण्याचे आव्हान

करमाळा येथे एसटी कर्मचाऱ्यांचा आजपासून संप सुरू; ‘या’ संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी दिला जाहीर पाठिंबा

सदर प्रकरणाने भिलारवाडी व पंचक्रोशीतील नागरिक हादरले आहेत व हळहळ व्यक्त केली जात आहे. सदर प्रकरणी करमाळा पोलीस अधिक तपास करत आहेत.

litsbros

Comment here