करमाळाकुर्डुवाडी

वाशिंबे ते भिगवन रेल्वे दूहेरीकरन व विद्युतिकरन अंतिम टप्प्यात

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

वाशिंबे ते भिगवन रेल्वे दूहेरीकरन व विद्युतिकरन अंतिम टप्प्यात

केतूर (अभय माने) सोलापूर-पुणे रेल्वे लोहमार्गावरील अंतिम टप्प्यातील वाशिंबे ते भिगवन 27 किलोमीटर दूहेरीकरनाचे व विद्युतीकरणाचे काम अंतिम टप्प्यात सुरु आहे.
रेल्वे सुरक्षा आयुक्त मनोज आरोरा,रेल्वे विभागीय व्यवस्थापक सोलापूर शैलेंद्द गुप्ता यांच्या उपस्थितीत मंगळावर दि, 9 रोजी वाशिंबे ते भिगवन स्थानका दरम्यान याकामाची पाहणी करणार आहेत.

यानंतर या मार्गावरुन रेल्वे चाचणी घेतली जाणार आहे.साधारणपणे पंधरा आँगष्ट नंतर या मार्गावरुन वाहतुक सुरू होणार आहे.त्यामुळे सोलापूर ते पुणे प्रवासादरम्यान चाळीस मिनिटांची बचत होणार असून रेंगाळणार्या प्रवासातून प्रवाशांची सुटका होणार आहे.

वाशिंबे ते भिगवण मार्ग एकेरी असल्याने क्रॉसिंग साठी गाडी थांबल्याने चोरी दरोड्यांचे प्रकार घडले आहेत.दूहेरीकरनामुळे अशा प्रकारांना आळा बसनार आहे. असे वरीष्ठ वाणिज्य व्यवस्थापक सोलापूर प्रदीप हिरडे यांनी सांगितले.

रेल्वे मार्गवरील रेल्वेची दुहेरीकरण विद्युतीकरण ही कामे पूर्ण झाली असली तरी या मार्गावरील मार्गाची काम बहुतेक ठिकाणी अर्धवट राहिले आहे त्यामुळे गावांचा संपर्क तुटला आहे एसटी सेवा ठप्प झाली आहे आजारी रुग्णांचे खूप हाल होत आहेत.

शाळकरी विद्यार्थी यांनाही कसरत करावी लागत आहे तरी ठेकेदारांनी सदर भुयारी मार्गाचे काम त्वरित करावे अशी मागणी ग्रामस्थातून होत आहे.रेल्वे प्रशासनेही याकडेही लक्ष द्यावे.

वाशिंबे ते भिगवण दरम्यान वाशिंबे रेल्वे स्थानक नजीक अंतिम टप्प्यातील विद्युतीकरणाचे काम करत असताना कर्मचारी..
छायाचित्र- अक्षय माने, केत्तूर

litsbros

Comment here