करमाळाताज्या घडामोडीशेती - व्यापारसोलापूर जिल्हा

करमाळा तालुक्यातील ‘हा’ शेतकरी करतो बैला ऐवजी घोड्याने शेती; परिस्थितीवर मात करणाऱ्या या शेतकऱ्याची परिसरात चर्चा व कौतुक

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा तालुक्यातील ‘हा’ शेतकरी करतो बैला ऐवजी घोड्याने शेती; परिस्थितीवर मात करणाऱ्या या शेतकऱ्याची परिसरात चर्चा व कौतुक

केम(संजय जाधव) ; आजकाल आपण घोडा हा प्राणी लग्नात नवरदेवाला परण्या काढण्यासाठी तसेच राजदरबारी व रेस साठि घोडयाचा ऊपयोग करताना पाहतो. पण करमाळा तालुक्यातील एक अवलिया शेतकरी बैला ऐवजी या घोड्याच्या सहायाने शेती करत आहे. आणि हा परिसर व तालुक्यात चर्चेचा विषय ठरला आहे.

करमाळा तालुक्यातील भाळवणी येथील शेतकरी रघुनाथ जाधव यांची आर्थिक परिस्थिती जेमतेम, त्यांच्याकडे मेंढराबरोबर एक शेंगरू होते. आता मोठे झाल्याव त्याचे नाव राजा ठेवले आहे. हा राजा आता चक्क बैला प्रमाणे शेतीची सगळी कामे करतो.

हेही वाचा- हुबेहूब चित्र रेखाटणारा करमाळयातील अवलिया म्हणजे महात्मा गांधी विद्यालयातील कलाशिक्षक खान सर

ई पीक पाहणीस ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ; शेतकऱ्यांनो ई पीक पहाणी स्वतः करा; करमाळा तहसील कार्यालयाकडून आवाहन

https://youtube.com/shorts/WDqrXJDaojQ?feature=share

विशेष म्हणजे एकटा राजा टिपणीला जुंपला तरी जोरात पेरणी होते. तो पेरणी करतो, खत टाकतो, पाळी घालतो, हि सर्व कामे करतो. असे शेतकरी रघुनाथ जाधव यांनी करमाळा माढा न्यूजशी बोलताना सांगितले.

या लाल शब्दांवर क्लिक करून पहा व्हिडीओ

सध्या पशुधन संपल्यात जमा आहे आणी ज्या शेतकऱ्यांकडे बैल आहेत ते इतरांं कडून दिड ते दोन हजार भाडे घेतात. त्यामुळे आम्ही हि सर्व शेती घोडयाच्या सहाय्यने करतो. त्यामुळे आता आम्हाला जरा ही शेती परवडती. ज्यावेळेस आम्ही घोडा औताला जुुंपतो, त्यावेळेस येणारी जाणारी लोक कुतूहलाने पाहत बसतात. पण आम्हा गरिबाला हा घोडा लय कामाचा हाय! 

– रघुनाथ जाधव, शेतकरी

litsbros

Comment here