शेतकरी केंद्रस्थानी ठेऊन विहाळ येथील माळरानावर भैरवनाथ शुगरची निर्मिती.. भैरवनाथ शुगरच्या गळीत हंगाम उद्घाटन प्रसंगी सावंत यांचे प्रतिपादन
केत्तूर (अभय माने) भैरवनाथ शुगर्स व कारखान्याचे संस्थापक सार्वजनिक आरोग्यमंत्री ना.प्रा.डॉ.तानाजी सावंत यांनी शेतकरी हा केंद्रस्थानी ठेवून आजपर्यंत ऊस उत्पादक व ऊस पुरवठादारांचे हित जोपासण्याकरिता विहाळ (ता.करमाळा) येथील माळरानावर साखर कारखाना उभारुन व खासगी साखर कारखानदारातील उत्कृष्ट व्यवस्थापन करुन शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य उचांवेल असे काम केले आहे.
त्यामुळे सामाजिक बांधिलकी यांचा उत्तम मिलाफ घडवून महाराष्ट्रातील यशस्वी कारखानदारीचे रोल मॉडेल म्हणून भैरवनाथ शुगरची ओळख असल्याचे गौरोद्गार कारखान्याचे अध्यक्ष तथा शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख प्रा.शिवाजी सावंत यांनी विहाळ (ता.करमाळा) येथील भैरवनाथ शुगर वर्क्सच्या 12 व्या गाळप हंगामाच्या मोळी पुजन कार्यक्रमा प्रसंगी व्यक्त केले.
प्रारंभी मोळी पुजन कार्यक्रमानिमित्त ऊसविकास अधिकारी प्रविण जाधव व त्यांच्या सुविद्य पत्नी तृप्ती जाधव या उभयतांचे हस्ते सत्यनारायण महापूजा संपन्न झाली.
यावेळी कारखान्याचे ज्येष्ठ संचालक कालिदास सावंत,ऊस उत्पादक बाळासाहेब गाडे,भजनदास खटके, संजय ढेरे,महेश गोसावी,राहूल नवले, अंकुश उपाळे,अभिजित कोकाटे,सागर टकले, दत्तात्रय सरडे,सतीश कानगुडे,मधुकर गुंडगिरे, भूषण खुळे
यांच्यासह,जनरल मॅनेजर रवीराज भोसले,प्रोसेस मॅनेजर संजय जाधव,चिफ अकौंटंट रामचंद्र कारंडे,कार्यालयीन अधीक्षक रवींद्र विघ्ने-पाटील,ऊस पुरवठा अधिकारी रामभाऊ चव्हाण-पाटील,जनरल पर्यवेक्षक राजेंद्र भुसारे,केनयार्ड सुपरवायझर पांडुरंग जमाले,स्टोअर किपर लक्ष्मण निडवंचे,गोडावून किपर बाळू काळे,कॅम्प सुपरवायझर पप्पु सुर्यवंशी
तसेच सर्व विभागप्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.
पुढे बोलताना ते म्हणाले,भैरवनाथने मागील अकरा वर्षात ऊस उत्पादक शेतकरी,तोडणी मजूर, वाहतूकदार,कर्मचारी व अधिकारी यांच्या पाठबळांवरच आजवरचे सर्व गळीत हंगाम यशस्वीपणे पूर्ण केले आहेत.
कारखान्याचे संस्थापक प्रमुख ना.प्रा.डॉ.तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना प्रशासनाने नेहमीच ऊस उत्पादक सभासद व शेतकरी यांच्या हिताला प्राधान्य दिले असून;त्यांनी दिलेल्या 7 लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दीष्ट पूर्ण करण्याचा निर्धार यावेळी त्यांनी व्यक्त केला.
” दरवर्षीच्या तुलनेने यंदाचा हंगाम परतीच्या पावसामुळे तसेच अतिवृष्टी झाल्याने लांबला असला तरीही ऊस उत्पादकांनी चिंता करु नये.त्याकरिता कारखान्यातील सर्व यंत्रणा सुसज्य करण्यात आली असून कारखाना पूर्णक्षमतेने चालविण्याचे योग्य नियोजन व्यवस्थापनाने केले आहे.
कारखान्याकडे 8900 हेक्टर उसाची नोंदणी झाली आहे तसेच हंगामासाठी आवश्यक असणाऱ्या ऊसतोडणी वाहतुकीचे सर्व करार पूर्ण झाले असून 250 ट्रक-ट्रॅक्टर,100 ट्रॅक्टरगाडी व ऊस तोडणी यंत्राच्या माध्यमातून गाळप करू आणि सभासद,कामगार,वाहतूकदार यांच्या सहकार्याने यंदाचाही गाळप हंगाम यशस्वी पार पाडू.
– किरण सावंत,(कार्यकारी संचालक)
सोबत: गव्हाण पुजन तसेच गव्हाणीत मोळी टाकताना प्रा.शिवाजी सावंत,कालीदास सावंत,किरण सावंत व मान्यवर यांचे छायाचित्र.
Comment here