आरोग्यकरमाळासोलापूर जिल्हा

भगतवाडी येथे महिलांनी दिला अनोखा वाण; हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमात वाण म्हणून इतर वस्तूंना नकार देत ‘प-पाळीचा’ हे महिलांचे मासिक

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

भगतवाडी येथे महिलांनी दिला अनोखा वाण; हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमात वाण म्हणून इतर वस्तूंना नकार देत ‘प-पाळीचा’ हे महिलांचे मासिक

केतूर (अभय माने) भगतवाडी येथील हिरकणी महिला स्वंयसहायता समूहाने उल्लेखनीय असे काम केले. मकरसंक्रातीच्या निमित्ताने एकत्र येत हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमा त वाण म्हणून इतर वस्तूंना नकार देऊन ह्या वेळेस ‘प -पाळीचा’ हे महिलांचे मासिक आरोग्य ,आहार याची माहिती देणारी पुस्तिका महिलांना ‘वाण’ म्हणून देण्यात आले.

यावेळेस समाजबंध संवादक पूजा शंकर गुंजाळ यांनी महिलांशी मासिक पाळी आरोग्य व आहार या विषयावर संवाद साधला. यावेळेस हिरकणी महिला स्वयंसहायता समूहाच्या अध्यक्ष सौ मंदा गुंजाळ व इतर सदस्य उपस्थित होते.

यावेळेस सदस्य रुक्मिणी भुजंग तानवडे यांनी सावित्रीबाई फुले यांची महती सांगणारे सुंदरसे गीत सादर केले. भगतवाडी सीआरपी मीरा गिरंजे आणि लिपीका शितल भागडे यांनी मोलाचे सहकार्य केले.

litsbros

Comment here