करमाळासोलापूर जिल्हा

भगतवाडीत मध्यरात्री विजेच्या तारा तुटल्याने ऊस पेटला: तरुणांच्या सतर्कतेमुळे 50 ते 60 एकर ऊस वाचला; आग विझवताना चार जणांना बसला शॉक पण..

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

भगतवाडीत मध्यरात्री विजेच्या तारा तुटल्याने ऊस पेटला: तरुणांच्या सतर्कतेमुळे 50 ते 60 एकर ऊस वाचला; आग विझवताना चार जणांना बसला शॉक पण..

केतूर (अभय माने ) भगतवाडी (ता.करमाळा) शिवारातील रोहिणी लक्ष्मण मुटके यांच्या गट नंबर 38 मधील सुमारे दोन एकर तोडणी योग्य ऊस सोमवारी ता.15) मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास शेतातून गेलेल्या विजेच्या खांबावरील सारा अचानक तुटल्याने ऊस आणि पेट घेतला हे माळावर पिकांना पाणी देत असलेल्या धनाजी टापरे या शेतकऱ्यांने पाहिले.

धनाजी यांनी गावातील तरुणांना ऊसाला आग लागल्याची कल्पना दिली ग्रामसुरक्षा दला मार्फत सर्वांना फोन जातच गावातील गावातील तरुणांनी एकत्र येऊन लागलेली आग आटोक्यात आणली व शेजारील 50 ते 60 एकर ऊस संभाव्य आगीपासून वाचवला.

या गेल्या चार वर्षापासून वादळी वाऱ्यात या ठिकाणचा विजेचा फोन वाकला आहे पोलवरील कप तुटल्याने तारा तुटून खाली पडल्यावर घर्षणाने उसाने पेट घेतला दरम्यान वीजप्रवाह मात्र सुरूच असल्याने लागलेली आग विझवताना चार जणांना विजेचा शॉक बसला.

त्यानंतर वीज मंडळास कळवून या ठिकाणचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आला. जळालेला ऊसाचा पंचनामा तलाठी भडगने यांनी केला आहे.

हेही वाचा- कोकण, पश्चिम महाराष्ट्र ते मराठवाड्यातील काही जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता, IMD कडून ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी- तुमचे कृषिपंपाचे वीजबिल ‘असे’ करा ५०% माफ

litsbros

Comment here