करमाळा

अभिमानास्पद; करमाळा तालुक्यातील भगतवाडीच्या लेकीचाअमेरिकेच्या हार्वर्ड विद्यापीठात डंका

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

अभिमानास्पद; करमाळा तालुक्यातील भगतवाडीच्या लेकीचाअमेरिकेच्या हार्वर्ड विद्यापीठात डंका

केत्तूर (अभय माने) अमेरिकेतील सर्वात जुने आणि प्रतिष्ठित हार्वड विद्यापीठाच्या अस्पायर लीडर प्रोग्रॅम (Aspire Leaders Program) मध्ये करमाळा तालुक्यातील भगतवाडीतील कृषी कन्या पूजा शंकर गुंजाळ यांची जगभरातून निवड करण्यात आलेल्या 364 प्रतिनिधींमध्ये यशस्वीपणे निवड करण्यात आली.

अत्यंत कठीण अशा पाच वेगवेगळ्या टप्प्यानंतर ही निवड झाली आहे .यामध्ये अमेरिका ,रशिया, चिली, नायजेरिया इत्यादी देशांच्या प्रतिनिधींसोबत भारताचे प्रतिनिधित्व करत आहेत. विशेष म्हणजे त्या महाराष्ट्रातून एकमेव आहेत.

या यशामागे सर्वात मोठा वाटा माझ्या आई -वडील आणि भावांचा आहे ,ज्यांनी खंबीरपणे कायम मला प्रोत्साहन दिले. त्यामुळे छोट्याशा गावातील मुलगी अमेरिकेतील विद्यापीठात स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करत आहे .जिद्दी, चिकाटी आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर सर्व काही शक्य आहे असे मनोगत पूजा यांनी व्यक्त केले.

पूजा गुंजाळ हिचे प्राथमिक शिक्षण- जिल्हापरिषद प्राथमिक शाळा भगतवाडी माध्यमिक शिक्षण शहाजीराजे उमाजी राजेभोसले हायस्कूल जिंती येथे झाले असून पदवी शिक्षण- डॉ.बुधाजीराव मुळीक कॉलेज ऑफ एग्रीकल्चर इंजीनियरिंग मांडकी- पालवण,दापोली विद्यापीठ येथे झाले.

हा प्रोग्रॅम ऑनलाईन होता भविष्यामध्ये हार्वड युनिव्हर्सिटी कडून नवनवीन संधी प्रदान होणार आहेत.

litsbros

Comment here