करमाळासोलापूर जिल्हा

करमाळा तालुक्यातील ‘या’ भागात ड्रोनच्या घिरट्या: नागरिकांत भीतीचे वातावरण!

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा तालुक्यातील ‘या’ भागात ड्रोनच्या घिरट्या: नागरिकांत भीतीचे वातावरण!

केत्तूर (अभय माने) उजनी लाभक्षेत्रातील केत्तूर, पारेवाडी, पोमलवाडी परिसरात गेल्या दोन दिवसापासून रात्रीच्या साडेनऊच्या पुढे दोन , चार ड्रोन कॅमेरे आकाशात घिरट्या घालत असल्याचे पाहिल्याने येथील सर्वसामान्य नागरिकांची व शेतकऱ्यांची भीतीपोटी झोप उडाली आहे.

तसेच आकाशातील ड्रोनमुळे अनेक तर्क वितर्क लढविले जात आसून अनेक मोठ्या अघटित घटना घडण्याची शक्यताही नाकारता येत नाही.यामुळे पोलिसांनी याकडे तात्काळ लक्ष देण्याची आवश्यकता आहे.

बारामती तालुक्यात गेली पंधरा दिवसापासून रात्रीच्या वेळी फिरणाऱ्या ड्रोनमुळे अनेकांची डोकेदुखी झाली होती.तोच आता या ड्रोनचे संकट आता उजनी धरण लाभक्षेत्रातील केतूर परेवाडी पोंमलवाडी या परिसरात रात्री नऊ ते 12 वाजेपर्यंत चार ड्रोन फिरून पुन्हा चांडगाव पळसदेव या भागातून पुढे जात असल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगितले आहे.

जाताना ड्रोन च्या साह्याने परिसराची पाहणी करून मोठ्या चोऱ्या होण्याचा संभव असल्याची अफवा जोर धरत आहे. केत्तूर येथील व्हाट्सअप ग्रुपवर ड्रोन फिरत असल्याचे व्हिडिओ व मेसेज व्हायरल होत असल्यामुळे अनेकांनी ड्रोन पाहिल्याचे सांगितले.

हेही वाचा – माजी आमदार नारायण आबा पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे निवेदनाद्वारे केली ‘ही’ मागणी

 

अचानकपणे फक्त रात्रीच्या वेळीच फिरणाऱ्या या ड्रोन मुळे अफवांचे पीक जोरात असून नागरिकात घबराटीचे वातावरण निर्माण झाली आहे. पोलीस प्रशासनाणे तात्काळ य घटनेची दखल घेऊन रात्रीचया वेळी फिरणाऱ्या ड्रोनची माहिती घरून कारवाही करण्याची मागणी जोर धरीत आहे..
याची तत्पर्तने दखल घेणे गरजेचे आहे.

litsbros