करमाळाक्राइमबार्शीसोलापूर जिल्हा

करमाळा येथील हॉटेलात वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या ‘त्या’ दोघांना बार्शी कोर्टात जामीन

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा येथील हॉटेलात वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या ‘त्या’ दोघांना बार्शी कोर्टात जामीन

उमरड (प्रतिनिधी) ; दिनांक02/07/2021 रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सुधाकर जगताप करमाळा पोलीस स्टेशन यांनी पिटा कायदा कलम 3,4,5 व भादवि कलम 370 प्रमाणे करमाळा पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली होती.

करमाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी मिळून करमाळा येथील एका हॉटेलात अनैतिक व्यापार चालू असल्याची माहिती मिळाल्यानंतर कारवाई केली होती.

त्या कारवाईत शंकर बबन खटके व संभाजी मधुकर रोटे यांना अटक करण्यात आली होती यातील आरोपींनी एडवोकेट निखिल पाटील यांचे मार्फत अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय बार्शी येथे जामीन मिळणे कामी धाव घेतली होती.

हेही वाचा- उजनी मायनस 23 टक्क्यांवरून मायनस 5 टक्क्यांवर; उजनी धरण पाणलोट धरणसाखळीत 6529 मि. पावसाची नोंद

वांगी नंबर 3 येथे covid-19 लसीकरणाचा उच्चांक; तब्बल ‘इतक्या’ नागरिकांचे झाले लसीकरण

सदर जामीन अर्जाची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्री जे सी जगदाळे यांच्यासमोर झाली सदर सुनावणीवेळी आरोपीचे वकील एडवोकेट निखिल पाटील यांनी पीटा कायद्याअंतर्गत सदरील आरोपी विरोधात कारवाई करता येणार नाही.

पिटा कायद्यामध्ये सदर आरोपी विरोधात कुठेही शिक्षेची तरतूद नाही तसेच आरोपीच्या वकिलांनी माननीय सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाचे निवाडे सादर केले. सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी शंकर बबन खटके व  संभाजी मधुकर रोटे यांची पंधरा हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामिनावर मुक्तता करण्यात आली.

सदर कामी आरोपीतर्फे एडवोकेट निखिल पाटील एडवोकेट नानासाहेब शिंदे करमाळा यांनी काम पाहिले

litsbros

Comment here