राज्यभरात केळी पुरवठ्या मध्ये तुटवडा, परिणामी दरात मोठी वाढ; करमाळा तालुक्यातील केळी उत्पादकांना दिलासा, 3 रुपयांवरून 13 रूपये किलो
केतूर (अभय माने ) मागील दोन महिन्यापासून गडगडलेल्या केळीच्या दरात मागील आठ दिवसांत चांगली सुधारणा झाली आहे.दर्जेदार केळींना उत्तर भारतासह आखाती देशात चांगला उठाव आहे.
उजनी लाभक्षेत्रातील करमाळा तालुक्यासह, टेंभुर्णी,ईंदापूर,पंढरपूर,
भागात मोठ्या प्रमाणात केळीचे उत्पादन होते.मात्र गेल्या आठवड्यापासून राज्यभरात केळी पुरवठ्या मध्ये तुटवडा जाणवू लागला आहे. परिणामी दरात सुधारणा झाली आहे.
निर्यातक्षम केळीचा दर 13 रुपये तर खोडवा केळी 7 ते 8 रुपये किलो. लहान पिकअप 5 ते 6 रुपये किलो दर शिवार खरेदीत मिळत आहे.
उजनी लाभक्षेत्रातील केळी दर्जेदार असल्याने उत्तर भारतासह आखाती देशात निर्यात होते.सध्या केळी चा पुरवठा कमी होत असल्याने खोडवा केळी बॉक्स पॅकींग कडे व्यापारी वर्ग वळला आहे.अकलूज येथील व्यापार्यांकडून करमाळा तालुक्यातील सुपर खोडवा बॉक्स पॅकींग करण्यात येत आहे.
“महाराष्ट्रातील केळी पुरवठ्या मध्ये तुटवडा निर्माण झाला आहे.तरआंध्र प्रदेशातील केळी हंगाम सुरू झाला आहे.तेथील केळींची निर्यातआखाती देशासह ऊत्तर भारतात होते. मात्र आंध्रातील केळी मुंबई बंदरापर्यंत आणण्यासाठी किलोमागे 3 ते 4 रूपये वाहतूक खर्च निर्यातदार कंपन्याना होतो.त्यामुळे उजनी लाभक्षेत्रातील केळीला पसंती दिली जात आहे. त्याचा लाभ केळी उत्पादक शेतकऱ्यांना होत आहे.”
—- संतोष बाबर, हिंगणी
केळी खरेदीदार, कंदर, ता, करमाळा.
Comment here