करमाळा

बामसेफ हे बहुजनांना त्यांच्या संवैधानिक हक्क अधिकारासाठी जागृत करणारे भारतातील एकमेव संघटन; करमाळा येथील प्रशिक्षण शिबिरात प्रतिपादन

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

बामसेफ हे बहुजनांना त्यांच्या संवैधानिक हक्क अधिकारासाठी जागृत करणारे भारतातील एकमेव संघटन; करमाळा येथील प्रशिक्षण शिबिरात प्रतिपादन

करमाळा (प्रतिनिधी) ; बहुजन नायक कांशीराम यांच्या स्मृतीदिनाचे औचित्य साधून बामसेफ आणि सहयोगी संघटनाचे करमाळा येथील जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबीर यशवीरित्या पार पडले असून या शिबिरास मराठवाडा बामसेफचे अध्यक्ष प्रा. सुर्यकांत गायकवाड यांनी मार्गदर्शन केले.

या शिबिरास उद्घाटक म्हणून प्रोटान जिल्हाध्यक्ष सुधीर कांबळे, आरपीआय-ए पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष नागेश कांबळे, ऍड. नईम काझी उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मराठा सेवा संघाचे प्रा. नागेश माने, संभाजी ब्रिगेड कार्याध्यक्ष नितीन खटके, जमियत उलेमा ए हिंदचे सदर मौलाना मोहसीन शेख,

भारत मुक्ती मोर्चा राज्य उपाध्यक्ष नानासाहेब चव्हाण, बहुजन मुक्ती पार्टी युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष काकासाहेब जाधव, बामसेफ राज्य कार्यकारणी सदस्य अरुण माने आदीजन उपस्थित होते. तर विशेष उपस्थिती म्हणून तुकाराम बनसोडे, आर आर पाटील, बबन फरतडे, कादिर शेख, अनिल कादगे, गजानन ननवरे, ऍड. तुकाराम राऊत,

प्रेसिंजीत लोंढे, मोहन राजगुरू, रणजीत सोनवणे, बशीर तांबोळी, भारत दळवी, गणेश उजगीरे, गौसपाक मुलाणी, सौरभ वाघमारे, इसाक पठाण, सत्यवान दुधाळ, राज जावीर आदिजन उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना प्रा. गायकवाड म्हणाले कि, बामसेफ बहुजनांना त्यांच्या संवैधानिक हक्क अधिकारासाठी जागृत करणारे आणि ते वाचवण्यासाठी काम करणारे भारतातील एकमेव संघटन आहे.

आज बहुजन समाजातील अधिकार, कर्मचारी, व्यावसायिक, शेतकरी, विद्यार्थी आणि महिलांनच्या हजारो समस्या व्यवस्थेने निर्माण केल्या आहेत. त्या समस्या सोडविण्यासाठी बहुजन समाजाने बामसेफ व भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि जनांदोलनाचे प्रवर्तक वामन मेश्राम यांच्या नेतृत्वामधील राष्ट्रव्यापी जनआंदोलनामध्ये शामिल होण्याशिवाय पर्याय नसल्याचे मत यावेळी प्रा. गायकवाड व्यक्त केले.

यावेळी बामसेफ प्रणीत छत्रपती क्रांती सेनेच्या जिल्हा कार्याध्यक्ष पदी सागर पवार यांची तर करमाळा तालुकाध्यक्ष पदी बाबुराव पाटील यांची निवड करण्यात येऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी शिबीराचे सूत्रसंचालन इंजि. कल्पेश कांबळे यांनी केले. प्रस्तावना बाळासाहेब तोरमल यांनी केली तर आभार गौतम खरात यांनी मानले.

सदर शिबिर यशस्वी करण्यासाठी बामसेफ, भारत मुक्ती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा आणि सहयोगी संघटना करमाळा व जेऊर युनिटच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

litsbros

Comment here