करमाळासोलापूर जिल्हा

करमाळा बाजार समिती सचिव पदाचा वाद; आजच्या बैठकीत पडली समसमान मते, आणि मग..

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा बाजार समिती सचिव पदाचा वाद; आजच्या बैठकीत पडली समसमान मते, आणि मग..

सचिव पदाचा चेंडू आता पणन संचालकांकडे :सचिव पदाचा पेच कायमच :ठराव पाटणेंचा पण डीडीआर यांचे मत कायद्यातील तरतुदीनुसार सेवाजेष्ठता व पात्रतेला पूरक, क्षीरसागर यांचा पदभार न देण्याचा निर्णय, १० पैकी ९ कर्मचारी ठाम

करमाळा(प्रतिनिधी) ;

आज बाजार समितीत कडेकोट पोलीस बंदोबस्तात झालेल्या बैठकीत सचिव पदासाठीच्या ठरावावर मतदान घेण्यात आले, त्यात बागल गट व जगताप गट यांच्या सचिव पदाच्या उमेदवाराच्या बाजूने समसमान ८ – ८ मते पडली. अखेर सभापती यांनी कास्टींग वोटचा वापर करून पाटणे यांचा ठराव केला. आज (ता.२९) जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांच्या उपस्थितीत बाजार समितीचे सभापती प्रा.शिवाजीराव बंडगर यांचे अध्यक्षतेखाली सकाळी अकरा वाजता बैठक घेण्यात आली. बैठकीत जिल्हा उपनिबंधक यांनी पणन कायद्यातील तरतुदी, सेवानियम, सेवाजेष्ठता सविस्तर सांगून प्रोसेंडींगला लेखी मत नोंदविले.

यावर सेवाजेष्ठतेने पदभार स्विकारलेले क्षीरसागर यांनी मी पणन संचालक यांचेकडे दाखल केलेले अपील प्रलंबीत असून सदरची बाब न्याय प्रविष्ठ आहे व आजचा संचालक मंडळाचा काठावरील ठराव हा बेकायदेशीर असून महाराष्ट्र कृषी उत्पन्न (विकास व विनीयमन ) १९६३, नियम १९६७, मंजूर उपविधी व कर्मचारी सेवा नियमांचा भंग करणारे असल्याने अपिलात जाणार व चार्ज देणार नसल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले.

ठरावाच्या बाजूने बागल, चिंतामणी जगताप, ढेरे, रोडगे, केकान, बंडगर, शिंदे, झाकणे तर ठरावाच्या विरोधात जयवंतराव जगताप, सरडे, पाटील, रणसिंग, लबडे, गुगळे, दोशी, मोरे यांनी मतदान केले. क्षीरसागर यांनाच कायद्याने न्याय मिळेपर्यंत सर्वच कर्मचारी एकसंधपणे नियमाने लढा देणार असल्याचे ढाणे यांनी सांगितले.

पूर्वीचे न्यायप्रविष्ट अपील व या ठरावाच्या विरोधात रितसर अपील दाखल करून न्यायनिर्णय होईपर्यंत चार्ज देता येणार नसल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले. त्यामुळे सध्या करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीतील सचिव पदाचा वाद अजून कायम आहे. आता यात पुढे नेमकं काय होतंय याकडे तालुक्यातील सर्वांचे लक्ष वेधले आहे.

litsbros

Comment here