करमाळाराजकारणसोलापूर जिल्हा

करमाळा बाजार समितीत बागल गटाला झटका; जगताप गटात आनंद

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा बाजार समितीत बागल गटाला झटका; जगताप गटात आनंद

करमाळा (प्रतिनिधी) ; पणन संचालकांनी रद्द केला बाजार समितीचा ठराव व सभापतींचा आदेश आणि सेवाज्येष्ठता व पात्रतेतुसारच सचिवाची निवड कायम ठेवली. पणन संचालकांच्या निर्णयामुळे प्रतिष्ठेच्या व वर्चस्वाच्या लढाईत जगताप गटाची सरशी झाली असून सभापती व बागल गटाला जबरदस्त धक्का बसला आहे, तर जगताप गटात आनंदोत्सव साजरा होत आहे.

बहुचर्चित अशा करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीने सचिव पदाचा पदभार पाटणे यांना सोपविणेचा करमाळा बाजार समितीचा ठराव व सभापतींचा आदेश सतीश सोनी पणन संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी रद्दबातल ठरविल्यामुळे विठ्ठल क्षीरसागर यांचेकडेच सचिव पदाचा पदभार कायम राहणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे .

जगताप व बागल गटाने अतिशय प्रतिष्ठेचा केलेला व गेली ३ महीने सुरु असलेला सचिव पदाचा वाद आता संपुष्टात आला आहे . पणन संचालकांच्या निर्णयामुळे बाजार समितीचे सभापती बंडगर व बागल गटाला जबरदस्त धक्का बसला आहे . स्थापने पासूनच बाजार समितीवर असलेली जगताप गटाची व गेली ३० वर्षे असलेली माजी आमदार जयवंतराव जगताप यांची असलेली पकड या निर्णयामुळे अधिक मजबूत झालेली आहे .

करमाळा बाजार समितीच्या स्थापने पासून काही अपवाद वगळता जगताप गटाचेच वर्चस्व आहे . माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी सलग २९ वर्षे बाजार समितीचे सभापती पदी कामकाज पाहीले आहे . परंतु सन २०१८ साली झालेल्या निवडणुकीत अंतर्गत बंडाळीतून जगताप गटातून निवडून आलेले शिवाजी बंडगर यांनी बंडखोरी करत सभापती पद मिळवले होते .

हेही वाचा- बँक ऑफ इंडिया कोळगाव शाखेत शेतकऱ्यांची पिळवणूक; बँक अधिकाऱ्याच्या हकालपट्टीची मागणी

आंदोलन करणाऱ्या सीना कोळगाव धरण मच्छिमार बांधवाना गुंड म्हणणारा ठेकेदारच खरा गुंड

परंतु तेव्हापासून आजतागायत बाजार समितीवर सातत्याने राजकीय अस्थिरतेचे परिणाम जाणवत आहेत . त्यातच बाजार समितीचे सचिव सुनील शिंदे हे ३१ मे रोजी सेवानिवृत्त झाले . त्यावेळी शिंदे यांनी सेवाज्येष्ठता व कायदयातील तरतुदीनुसार सेवाज्येष्ठ कर्मचारी विठ्ठल क्षीरसागर यांचेकडे सचिवपदाचा पदभार सोपविला व बाजार समितीत नवीन वादाला तोंड फुटले .

सभापती बंडगर व बागल गटाला सचिव पदाचा पदभार क्षीरसागर यांचेऐवजी पाटणे यांचेकडे सोपवायचा होता . क्षीरसागर यांचेकडील पदभार मान्य नसल्यामुळे सभापती बंडगर यांनी पणन संचालक यांचेकडे तक्रार करत सचिव पदभारा बाबत जिल्हा उपनिबंधकांच्या उपस्थितीत नव्याने संचालक मंडळाची बैठक आयोजीत करणेची मागणी केली .

त्यानुसार २९जून रोजी झालेल्या बैठकीत समसमान मते पडल्यामुळे सभापतींच्या निर्णायक मताच्या आधारे पाटणे यांचा ठराव मंजूर झाला .परंतु या बैठकीत जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांनी कर्मचारी सेवानियम व कायद्याच्या तरतूदी अवगत करत तशी इतिवृत्तात नोंद केली होती . पाटणे यांचा ठराव मंजूर झाला पण क्षीरसागर यांनी चार्ज देणेस ठामपणे नकार देत तातडीने ठरावाच्या व पूर्वीच्या आदेशा विरोधात पणन संचालकांकडे अपील दाखल केले .

त्यावर पणन संचालकांनी १२ जुलै स्थगिती आदेश दिल्यामुळे क्षीरसागर यांचेकडेच सचिव पदाचा पदभार होता . त्यानंतर आता पणन संचालक सतिश सोनी यांनी विठ्ठल क्षीरसागर यांनी सेवा ज्येष्ठता व पात्रतेनुसार सचिव पदी नेमणुकीबाबत केलेले अपील व मागण्या मंजूर करीत बाजार समितीने केलेला ठराव व सभापतींचा आदेश रद्दबातल ठरविला आहे .

त्यामुळे क्षीरसागर यांचे कडील सचिव पदाचा पदभार कायम राहीला आहे . पणन संचालकांच्या या निर्णयामुळे माजी आ .जगताप गटात आनंदोत्सव साजरा केला जात आहे . या अपीलाच्या सुनावणी मधे क्षीरसागर यांचे वतीने ॲड .अभय इनामदार, पाटणे यांचे वतीने ॲड. तोष्णीवाल, राऊत तर सभापतींच्या वतीने ॲड. सोमण, यांनी काम पाहीले .

अपीलावरील निर्णयानंतर माजी आमदार जयवंतराव जगताप, आमदार संजयमामा शिंदे, नगराध्यक्ष वैभवराजे जगताप, युवानेते शंभुराजे जगताप, माजी उपनगराध्यक्ष ॲड. कमलाकर वीर यांनी क्षीरसागर यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

litsbros

Comment here