आरोग्यकरमाळासोलापूर जिल्हा

करमाळा तालुक्यात बदलत्या वातावरणामुळे किरकोळ आजारात वाढ: आरोग्य विभागाने वेळीच सतर्क राहण्याची गरज

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा तालुक्यात बदलत्या वातावरणामुळे किरकोळ आजारात वाढ: आरोग्य विभागाने वेळीच सतर्क राहण्याची गरज

केतूर (अभय माने) करमाळा तालुक्यात बदलत्या वातावरणामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत रोज ढगाळ वातावरण तसेच पावसाच्या सरी याचा परिणाम आरोग्यावर होत आहे त्यामुळे सर्दी ताप थंडी खोकला या आजारांची आजारांच्या रुग्णात वाढ होत आहे.

तालुक्यांमध्ये गेल्या दहा-बारा दिवसांपासून वातावरणात मोठा बदल झाला आहे दिवसा प्रचंड उष्णता ढगाळ वातावरण तर सायंकाळी पाऊस या वातावरणाने नागरिक त्रासून गेले आहेत.

बदलत्या वातावरणाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होताना दिसत आहे. त्यातच मच्छर व डासांचे प्रमाण वाढले आहे.

ही सगळी लक्षणे कोरोना संसर्गाची असल्याने नागरिकही घाबरत आहेत नागरिकांनी घाबरून न जाता अशी लक्षणे दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा तसेच कोरोना चाचणी न भिता करावी असा सल्ला डॉक्टर मंडळी कडून दिला जात आहे.

हेही वाचा-ग्रामपंचायत उमरड व बुधरानी हॉस्पिटल पुणे यांच्या वतीने उमरड येथे नेत्रतपासणी शिबीर संपन्न

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या पीएचडीच्या प्रवेशपूर्व परिक्षेसाठी अर्ज करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात

आरोग्य विभागाने सतर्क राहण्याची गरज-

आशा या वातावरणामुळे डेंगू मलेरिया, चिकनगुनिया यासारखे संसर्गजन्य रोग वाढण्याची शक्‍यता नाकारता येत नाही त्यामुळे आरोग्य विभागाने योग्य ती खबरदारी घेऊन सतर्क राहण्याची गरज आहे.

litsbros

Comment here