करमाळाधार्मिक

आवाटी येथे गौसे आजम निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या भक्तीमय व शांततेच्या वातावरणात संपन्न: राज्यभरातील लाखो भक्तगणांनी उपस्थिती 

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

आवाटी येथे गौसे आजम निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या भक्तीमय व शांततेच्या वातावरणात संपन्न: राज्यभरातील लाखो भक्तगणांनी उपस्थिती

करमाळा(प्रतिनिधी); आवाटी येथील हजरत वली चांद पाशा दर्गाह मध्ये ग्यारहवी शरीफ निमित्त आयोजित करण्यात आलेल्या गौसे आजम कार्यक्रमाला उस्फूर्त व मोठा प्रतिसाद मिळाला सदर कार्यक्रमाचा लाभ राज्य तसेच परराज्यातील लाखो भावीकांनी घेतला.

ग्यारहवी शरीफ निमित्त बगदाद शरीफ येथील गौसेपाक यांच्या स्मृती प्रित्यर्थ दरवर्षी आवाटी येथील दर्गाह मध्ये गौसे आजम चा धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात येत असतो यामध्ये यावर्षी लाखो भाविकांनी गौसे आजम च्या गिलाफे मुबारक चादरीचा तसेच मुये मुबारक चे दर्शन घेतले याशिवाय हजारो भक्तगणांनी मुरीद होण्याच्या कार्यक्रमात सहभाग दर्शविला आलेल्या भक्तगणांना लंगर खाना चे आयोजन करण्यात आले होते याशिवाय अनेक भक्तगणांनी तोषेकी नियाज या उपक्रमात सहभाग दर्शवून मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.

गौसे आझम निमित्त दर्गाह परिसरात विद्युत रंगाच्या विद्युत रोषणाई करण्यात आली होती याशिवाय आलेल्या भक्तगणांना पार्किंगची व्यवस्था तसेच राहण्याची व्यवस्था दर्गाह कमिटीच्या वतीने करण्यात आली होती.

या कामी करमाळा पोलीस कर्मचाऱ्यांनी देखील सहकार्य केले गौसे आजम कार्यक्रमा निमित्ताने दर्गाह मध्ये वली बाबा चे खादिम गुलाम नबी कादरी यांनी फातीहाखाणी केली.

यावेळी त्यांच्या समवेत इरफान कादरी तसेच वली बाबाचे लाडके दुलारे हसनैन कादरी हे उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाला आलेल्या तसेच दर्गाहला भेटी दिलेल्या अनेक मान्यवरांचे दर्गाह ट्रस्ट तसेच आवाटी ग्रामस्थ यांच्या वतीने पाहुण्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.

सदरचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी दर्गाह ट्रस्टच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अहोरात्र विशेष परिश्रम घेतले.

एकंदर पाहता आवाटी येथील वली बाबा दर्गाह मध्ये गौसे आजम चा कार्यक्रम मोठ्या भक्तीमय वातावरणात तसेच लाखो भाविकांच्या उपस्थितीमध्ये शांततामय पद्धतीने साजरा करण्यात आला असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष हाजी कादरभाई तांबोळी यांनी दिली

litsbros

Comment here