करमाळाधार्मिक

आवाटी येथे दिनांक १२ नोव्हेंबर रोजी जशने गौसे आजम निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन; धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे ट्रस्टच्या वतीने आवाहन

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

आवाटी येथे दिनांक १२ नोव्हेंबर रोजी जशने गौसे आजम निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन; धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे ट्रस्टच्या वतीने आवाहन

करमाळा (प्रतिनिधी); हिंदू मुस्लिम एकात्मतेचे प्रतीक असणाऱ्या आवाटी येथील सुफी हजरत वली चांद पाशा दर्गाह मध्ये येत्या 12 नोव्हेंबर 2022 उर्दू तारीख 17 ग्यारहवी शरीफ हिजरी सन 1444 रोजी जशने गौसे आजम निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे भरगच्च आयोजन करण्यात आल्याची माहिती दर्गाह ट्रस्टचे अध्यक्ष हाजी कादरभाई तांबोळी माहिती यांनी दिली.

आवाटी येथे प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी जशने गौसे आजम निमित्त दर्गाह परिसरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये सकाळी नऊ ते रात्री आठ वाजेपर्यंत जियारते मुए मुबारक आणि गिलाफे मुबारक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

याशिवाय तोशेकी नियाज चे आयोजन करण्यात आले आहे तसेच आलेल्या भक्तगणांना दिवसभर लंगर खाना अर्थात महाप्रसाद चे आयोजन करण्यात आले आहे सदर लंगरखानाचा आस्वाद भक्तगणांनी घ्यावा असे आवाहन ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.


जसने गोसे आजम निमित्त आवाटी येथील वली बाबा दर्गाह मध्ये विविध प्रकार ची विद्युत रोषणाई करण्यात आली असून राज्य तसेच परराज्यातून आलेल्या भक्तगणां साठी राहण्याची व पार्किंगची व्यवस्था दर्गाह ट्रस्टच्या वतीने योग्य पद्धतीने करण्यात आली आहे.

सध्या पवित्र असा ग्यारहवी शरीफ चा महिना असून या महिन्यांमध्ये मुस्लिम बांधव बगदाद शरीफ येथील हजरत गौसे आजम यांच्या स्मृती प्रित्यर्थ ग्यारहरी शरीफ महिना मोठ्या उत्साहात साजरा करतात याचाच एक भाग म्हणून आवाटी येथील दर्गाह मध्ये गौसे आजम चा कार्यक्रम मोठ्या भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात येतो.

सदरच्या उपयुक्त धार्मिक कार्यक्रमाचा लाभ जास्तीत जास्त भक्तगणांनी घ्यावा असे आवाहन दर्गाह ट्रस्टच्या वतीने वली बाबा चे खादीम गुलामनबी कादरी तसेच इरफान कादरी याशिवाय बाबाचे दुलारे हसनैन कादरी यांनी केले आहे

litsbros

Comment here