करमाळा

कुंभेज फाट्यावर जनशक्तीच्या खुपसे पाटलांनी केला रस्ता रोको आणी करमाळयाची वीज झाली सुरळीत

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

कुंभेज फाट्यावर जनशक्तीच्या खुपसे पाटलांनी केला रस्ता रोको आणी करमाळयाची वीज झाली सुरळीत

जनशक्ती शेतकरी संघटनेचा रस्ता रोको संपन्न

करमाळा प्रतिनिधी | करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित केल्यामुळे जनशक्ती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अतुल खूपसे यांनी रस्ता रोको केला, या रस्ता रोकोला शेकडो शेतकरी उपस्थित होते. तालुक्यातील अनेक गावांमध्ये शेतातील वीज ८ तासावरून १ तास केली होती. त्यानंतर वेळोवेळी शेतकऱ्यांसाठी सामोरं येणारे अतुल खूपसे यांच्या लक्षात काही शेतकऱ्यांनी फोन करून ही बाब लक्षात आणून दिली. गेल्या आठ दिवसांपासून सोशल मीडियावर या आंदोलनाची चर्चा सुरू होती.

२४ ऑगस्ट रोजी १२ वाजता हे आंदोलन होणार म्हणून सकाळी आठ वाजल्यापासून तगडा बंदोबस्त तैनात केला होता वेगवेगळ्या आंदोलनासाठी आणी गणीमी काव्याने आंदोलन करणारे आंदोलक अतुल खुपसे पाटिल हे पोलीसांना चकवा देत आगोदर स्वताची गाडी पुढे पाठवून ते पाठीमागून एका तिनचाकी रिक्षा मध्ये ऐत रस्ता रोको आंदोलन चालू केले.

अहमदनगर ते टेंभुर्णी महामार्गावर कुंभेज फाटा येथे रस्ता रोको करण्यात आला, यावेळी खूपसे पाटील बोलताना म्हणाले की भविष्यात कोणत्याही शेतकऱ्यानी कसलीही वीज प्रश्र्नी किंवा कोणतेही समस्या आली तरी माझ्याशी संपर्क साधावा, प्रत्येक शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करेल.

आज या ठिकाणी शेकडोंच्या संख्येत शेतकरी जमा झाले, त्याबद्दल सर्व शेतकऱ्यांचे अभिनंदन आपल्या एकीने आज आपल्याला न्याय मिळत आहे. तसेच विद्यमान आमदारांनी दोन तास वीज देण्याची घोषणा केली आहे. मात्र दोन तास वीज आल्यानंतर नदीतून किंवा विहिरीतून शेतात पाणी पोहचायला तेवढा वेळ लागतोय. ८ तास वीज मिळाल्यानंतर शेतकऱ्यांचा वीज प्रश्न मार्गी लागेल. आज शेतकऱ्यांच्या एकीचा विजय झाला असे मला वाटते.

पुढे बोलताना खूपसे पाटील म्हणाले की, आजी माजी आमदार फक्त निवडणुकीच्या वेळेस मत मागण्यासाठी येतात. मात्र निवडणुका झाल्या की तालुक्याकडे फिरकत नाहीत, मतदान करण्यासाठी लाखोंचा खर्च करतात आणि त्याच्या जीवावर निवडून येतात. आज वीज खंडित झाली कोणताच राजकीय पुढारी समोर आला नाही. मग शेतकरी अशांना का निवडून देतो? असा प्रश्नही आज त्यानी उपस्थित केला.

हेही वाचा- ब्रेकिंग : केंद्रीय मंत्री नारायण राणेंना अखेर अटक

पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची मुंबईला बदली; सोलापूरच्या नूतन पोलीस आयुक्तपदी कराळे; वाचा सविस्तर

आंदोनाची व्याप्ती पाहून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी वीज पुरवठा पुन्हा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये पुन्हा आनंदाचे वातावरण पसरले यावेळी किरण भांगे,अजित विघ्ने, राणा महाराज वाघमारे, अविनाश कोडलिगे महाराज, नाना तकीक,हनु यादव,शुभम बंडगर,विजय खुपसे, यांनी आपले विचार व्यक्त केले

विशेष म्हणजे आमदार होण्यासाठी पुढारी पैसे वाटतात पण गरिब शेतकऱ्यानी पैसे नसतील तर त्यानी स्वता आर्थीक मदत करणार असल्याचे सांगीतले.

यांनी ज्याला जमेल तसे बिल भरा विज खंडीत न करता जमेल तेवडे बिल भरा आणी कोणी महावितरणचा अधिकारी कायदा पायदळी तुडवत आसेल तर शेतकरच्या मुलांनी कायदा हातात घ्यावा मी त्याच्या पाठीशी आहे आसे आव्हान त्यानी केला

litsbros

Comment here